Naseeruddin Shah Birthday : नसीरुद्दीन शाह यांची 'फिल्मी' लव्ह स्टोरी; रत्ना पाठक यांच्या आधी कोणाला करत होते डेट?
नसीरूद्दीन शाह यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. नसीरूद्दीन शाह यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत...

Naseeruddin Shah : पार (Paar),मंडी (Mandi),अ वेडनेसडे (A wednesday), द डर्टी पिक्टर (The Dirty Picture)यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah)यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. नसीरूद्दीन शाह यांचा जन्म 20 जुलै 1950 रोजी झाला. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. नसीरूद्दीन शाह यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबाबत...
नसीरुद्दीन शाह यांची लव्ह लाईफ
नसीरुद्दीन शाह हे त्यांच्यापेक्षा 15 वर्ष मोठ्या असलेल्या मनारा सीकरी यांना डेट करत होते. मनारा या विवाहित होत्या पण तरी देखील त्यांनी नसीरुद्दीन यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मनारा या 35 वर्षांच्या होत्या तर नसीरुद्दीन शाह हे 20 वर्षाचे होते. मनारा आणि नसीरुद्दीन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मनारा या सुरेखा सीकरी यांच्या बहिण आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी 1982 मध्ये रत्ना पाठक यांच्यासोबत दुसरे लग्न केले.
नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ते एफटीआईआयमध्ये असताना शबाना आजमी यांनी नसीरुद्दीन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. शबाना आजमी यांनी नसीरुद्दीन यांचा फोटो पाहिला होता तेव्हा त्यांना नसीरुद्दीन यांचा लूक आवडला नव्हता. पण त्यानंतर त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
नसीरुद्दीन शाह यांनी बॉलिवूडबरोबच पाकिस्तानी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. खुदा के लिये या पाकिस्तानी चित्रपटामध्ये नसीरुद्दीन यांनी कॅमियो भूमिका साकारली. तसेच काही हॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका साकारली आहे. जमून,कुत्ते या आगामी चित्रपटांमधून नसीरुद्दीन शाह हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
हेही वाचा:
- Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले, 'लोकांमध्ये चांगली समज निर्माण करावी'
- Naseeruddin Shah : वयाच्या 71 व्या वर्षी नसीरुद्दीन शाह यांना झाला 'हा' आजार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
