(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Poonam Pandey In Hospital : अभिनेत्री पूनम पांडे रुग्णालयात, पतीला अटक; मुंबई पोलिसांची माहिती
Poonam Pandey Admitted In Hospital : अभिनेत्री पूनम पांडे हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Poonam Pandey Admitted In Hospital : अभिनेत्री पूनम पांडे हिला सोमवारी रात्री उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला पोलिसांनी अटक केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं मुंबई पोलिसांच्या हवाल्यानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. पूनम पांडे हिला रुग्णालयात का दाखल केलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पूनम पांडेच्या तक्रारीनंतर सॅम बॉम्बे याला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
पूनम पांडे हिने पती सॅम बॉम्बे याच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक केली होती. सोमवारीच सॅम बॉम्बे याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं सॅम बॉम्बे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Maharashtra | Actress Poonam Pandey's husband Sam Bombay was arrested yesterday in Mumbai after the actress complained that he assaulted her. Poonam Pandey was admitted to a hospital: Mumbai Police
— ANI (@ANI) November 8, 2021
याआधीही पूनम पांडे हिने पती सॅम बॉम्बे याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. सप्टेंबर 2019 मध्ये पूनमनं गोव्यात सॅम बॉम्बे याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये सॅम बॉम्बे आणि पूनम पांडे विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या अवघ्या 12 दिवसानंतरच पूनम पांडेनं पती सॅम बॉम्बे यांच्यातील वादाचं प्रकरण समोर आलं होतं.
गतवर्षी पूनम पांडेनं पती सॅम बॉम्बे याच्याविरोधात छेडछाड, धमकी आणि मारपीट करण्याचा आरोप केला होता. पूनम पांडेच्या तक्रारीनंर गतवर्षीही गोवा पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक केली होती. त्यानंतर जामीनावर सॅम बॉम्बे बाहेर आला होता.
अश्लील व्हिडीओप्रकरणी पूनम-सॅम यांना केली होती अटक-
अश्लील व्हिडीओप्रकरणी पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी अटक केली होती. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला विंगने कॅनकोना पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. यामुळे व्हिडीओच्या माध्यमातून अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली पूनम पांडे कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना प्रत्येकी 20,000 रुपयांच्या जामीनावर सोडण्यात आले होतं.