Mulgi Zali Ho : किरण माने, अजय पुरकरांनंतर ‘या’ अभिनेत्रीचीही ‘मुलगी झाली हो’मधून एक्झिट!
Mulgi Zali Ho : अभिनेता अजय पुरकर यांनी स्टार प्रवाहची 'मुलगी झाली हो' मालिका सोडल्यानंतर काहीच दिवसांनी, मुख्य भूमिका साकारणारी आणखी एक अभिनेत्री देखील हा शो सोडत असल्याचे समोर आले आहे.
Mulgi Zali Ho : अभिनेता अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी स्टार प्रवाहची 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) मालिका सोडल्यानंतर काहीच दिवसांनी, मुख्य भूमिका साकारणारी आणखी एक अभिनेत्री देखील हा शो सोडत असल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या मालिकेत ‘आर्या राजन सरदेशमुख’ ही भूमिका करणारी अभिनेत्री श्वेता अंबिकर (Shweta Ambikar) लवकरच मालिका सोडणार आहे. आता एका इंस्टाग्राम पेजनेदेखील आपल्या पोस्टमध्ये श्वेताने शो सोडल्याचा दावा केला आहे.
अभिनेता अजय पुरकर यांनी मालिकेत ‘राजन सरदेशमुख’ यांची भूमिका साकारली होती. नुकत्याच एका फेसबुक पोस्टमध्ये अजय यांनी जाहीर केले की, त्यांनी हा शो सोडला आहे. अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, मुलगी झाली होच्या सेटवर मला अनेक नवीन गोष्टींचा आनंद आणि अनुभव मिळाला. अजय यांनी दिग्दर्शक सचिन देव आणि मालिकेच्या संपूर्ण टीमचेही कौतुक केले. या मालिकेने मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. आपण लवकरच दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे सांगत त्यांनी आपल्या पोस्टचा शेवट केला.
वादांमुळे मालिका चर्चेत!
यापूर्वी देखील 'मुलगी झाली हो' ही मालिका अनेक कारणांमुळे चर्चेत आली होती. या मालिकेत ‘विलास पाटील’ ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना या शोमधून काढून टाकण्यात आले होते. या प्रकरणानंतर माने यांनी आरोप केला होता की, त्यांच्या राजकीय मतांमुळे त्यांना शोमधून काढून टाकण्यात आले आहे. हे प्रकरण खूप दिवस चर्चेत होते.
मालिकेची वेळ बदलल्यानंतर एका फेसबुक पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिले की, शोमधून त्यांची एक्झिट झाल्यानंतर मालिकेचे रेटिंग कमी झाले. ते म्हणाले की, शोचे रेटिंग इतके खराब होते की, चॅनलकडे शो प्राईम टाईम स्लॉटमधून काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
हेही वाचा :
- Malaika Arora : अपघातातून बचावल्यानंतर मलायका अरोराने शेअर पहिला फोटो, म्हणाली...
- Hanuman Jayanti : सुखविंदर सिंह यांची ‘बजरंगबली’ भक्तांना खास भेट! अयोध्येत लाँच केला ‘हनुमान चालिसा’ म्युझिक व्हिडीओ
- Alia-Ranbir Wedding : वधूवेशात लाडक्या आलियाला पाहून मराठमोळा बॉडीगार्डही झाला भावूक! पोस्ट लिहित म्हणाला...