एक्स्प्लोर

Malaika Arora : अपघातातून बचावल्यानंतर मलायका अरोराने शेअर पहिला फोटो, म्हणाली...

Malaika Arora  : मलायका अरोराने इन्स्टा स्टोरीवर स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. यासोबतच तिने तिच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

Malaika Arora  : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा (Malaika Arora) काही दिवसांपूर्वी कार अपघात झाला होता. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, लवकरच तिला डिस्चार्ज देखील देण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, मलायकाच्या या अपघातात तिच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. हे ऐकून तिचे चाहते काळजीत होते. मात्र, आता मलायकाने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

मलायका अरोराने इन्स्टा स्टोरीवर स्वतःचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. यासोबतच तिने तिच्या तब्येतीची माहिती दिली आहे. या फोटोत ती पूर्वीसारखीच सुंदर दिसत आहे. मात्र, तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. फोटो पोस्ट करत मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हिलिंग'.  याचाच अर्थ ती आता ठीक होत आहे.

पोस्ट शेअर करत सांगितली अवस्था

कार अपघातानंतर काही दिवसांनी मलायका अरोराने एक लांबलचक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले की, 'गेले काही दिवस आणि माझ्यासोबत घडलेल्या घटना अविश्वसनीय आहेत. जेव्हा मी त्यांच्याबद्दल विचार करते, तेव्हा त्या चित्रपटातील एखाद्या दृश्यासारख्या वाटतात, जे कधीही घडले नाही. हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी अपघातानंतर माझी खूप काळजी घेतली. ज्यांनी मला रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली त्यांचेही आभार. माझे कुटुंब सतत माझ्या पाठीशी उभे होते.’


Malaika Arora : अपघातातून बचावल्यानंतर मलायका अरोराने शेअर पहिला फोटो, म्हणाली...

मी फायटर आहे!

मलायका अरोराने पुढे लिहिली की, 'माझ्या डॉक्टरांनी माझ्या सुरक्षेची काळजी घेतली. माझे मित्र, कुटुंब, माझी टीम आणि माझ्या इन्स्टा परिवाराकडून मला मिळालेले प्रेमही प्रचंड आहे. हे क्षण एक भावना नसून, एक आठवण आहे की, आपण त्या अनोळखी लोकांचे आभार मानले पाहिजे, जे गरजेच्या वेळी तुमच्यावर खूप प्रेम करतात. मी आता बरी होत आहे. मी एक लढाऊ आहे आणि मलायका म्हणून मी परत येईन.’

मलायकाचा भीषण अपघात

अभिनेत्री मलायका अरोराचा 2 एप्रिलच्या रात्री अपघात झाला होता. पुण्याहून घरी परतत असताना हा अपघात झाला. खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितले की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 38 किमी अंतरावर हा अपघात झाला. त्यावेळी मलायका पुण्यात एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होऊन परतत होती. त्याचवेळी मलायका अरोराच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यांच्या कारची मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) अधिकाऱ्यांच्या वाहनांना धडक बसली.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Condolence Meet Varsha Usgaonkar: 'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
'स्वतःला मोठ्ठी हिरोईन समजतेस का?', नाना पाटेकरांनी वर्षा उसगावकरांना सुनावलेलं, नेमकं काय घडलेलं?
Sonali Kulkarni: 'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
'चेहरा आरशात बघ, सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाही'; सोनाली कुलकर्णीचा ऑडिशनमधील कटू अनुभव
Imran Khan: सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
Chikeezing Movie Teaser: उंच स्वप्नांची गगनभरारी, निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास; 'चिकीझिंग'चा हृदयस्पर्शी टीझर पाहिलात?
उंच स्वप्नांची गगनभरारी, निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास; 'चिकीझिंग'चा हृदयस्पर्शी टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
Sahar Shaikh Father Yunus Shaikh joins Shinde Shivsena: संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
संपूर्ण मुंब्रा हिरवा करु म्हणणाऱ्या सहर शेखच्या वडिलांना शिंदे सेनेत मानाचं पान, युनुस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Embed widget