(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate: काकूबाई! मुग्धा-प्रथमेशच्या फोटोवर ट्रोलर्सच्या कमेंट्स; माकड म्हणतं आपलीच लाल.., बायकोला बोलणाऱ्यांना प्रथमेशचं चोख उत्तर
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate: गायक मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या दोघांनी काही महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली.
Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate: सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम रोहित राऊत (Rohit Raut), कार्तिकी गायकवाड यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केलं. त्यानंतर यातील एक गोड जोडी काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिल्यानं चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. त्यानंतर त्यांचा लग्नसोहळाही थाटात पार पडला. मुग्धा आणि प्रथमेश त्यांच्या आयुष्यातील गोड क्षण कायमच सोशल मीडियावरुन शेअर करत असतात. नुकतच त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोवर ते दोघेही ट्रोल झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण त्यावर प्रथमेशनेही तसंच उत्तर दिलं.
मुग्धा आणि प्रथमेश यांनी नुकतच त्यांच्या लग्नाला 3 महिने पूर्ण झाल्याबद्दल एक फोटो शएअर केला होता. मुग्धा आणि प्रथमेश यांनी काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली. दरम्यान मुग्धा त्यांच्या या फोटोवर ट्रोलर्सकडूनही बऱ्याच कमेंट्स आल्या आहेत. यातील एकाने मुग्धाला काकुबाई म्हटलं. त्यावर त्या ट्रोलर्सना प्रथमेशनी चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय.
मुग्धा प्रथमेशच्या फोटोवरील कमेंट्स
मुग्धा आणि प्रथमेशच्या या फोटोवर एकाने कमेंट करत म्हटलं की, काकु झाली आहे टिपिकल बाई. या कमेंटवर मुग्धाने त्या युजरला धन्यवाद आजी असं उत्तर दिलं. पुन्हा त्या युजरने मुग्धावर कमेंट करत म्हटलं की, मी काही तुझ्यासारखी नाही मॉर्डन आहे. तू टीपिकल बाईसारखी आहेस. यावर मात्र प्रथमेशनं चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. प्रथमेशनी म्हटलं की, आमच्या कोकणात एक म्हण आहे.. “माकड म्हणतं आपलीच लाल..” just सांगितलं.. बाकी मनात काही नाही आजी.. दरम्यान एका युजरने मुग्धा विचारलं कशा आहात आजी, त्यावर मुग्धाने मी एकदम मस्त आजोबा असं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं.
मुग्धा प्रथमेशची पोस्ट काय?
कालच आमच्या लग्नाला 3 महिने पूर्ण झाले! याच निमित्ताने आज गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महराजांचं दर्शन घेतलं, असं कॅप्शन देत मुग्धा आणि प्रथमेशनी त्यांचा फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram