(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mouni Roy : मौनी अडकली लग्नबंधनात; दाक्षिणात्य पद्धतीनं पार पडला विवाह सोहळा
Mouni Roy Wedding : अभिनेता अर्जुन बिजलानीनं सोशल मीडियावर मौनीच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
Mouni Roy Wedding : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. आज गोव्यामध्ये मौनी आणि सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. अभिनेता अर्जुन बिजलानीनं सोशल मीडियावर मौनीच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये मौनी दाक्षिणात्य लूकमध्ये दिसत आहे. यावरून लक्षात येते की दाक्षिणात्य पद्धतीनं सूरज आणि मौनीचा लग्न सोहळा पार पडला. मौनी पांढऱ्या आणि लाल रंगाची साडी, गोल्डन कलरचे दागिने आणि केसांमध्ये गजरा या लूकमध्ये दिसत आहे. तर मौनीचा पती सूरज हा सोनेरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची लूंगी अशा लूकमध्ये दिसत आहे. मौनी आणि सूरजचा हा फोटो शेअर करून अर्जुननं कॅप्शनमध्ये लिहिले, 'मिस्टर अॅण्ड मिसेस नांबियार '
View this post on Instagram
प्रसिद्ध गायक मनमीत सिंहने देखील मौनीचे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Neha Kakkar : 500 रूपयांच्या नोटा वाटणं नेहाला पडलं महागात; लहान मुलांनी घेरलं, पाहा व्हिडीओ
Mouni Roy Wedding : मौनी रॉयच्या हाताला लागली सूरज नांबियारच्या नावाची मेहंदी
Mouni Roy : नागिन फेम मौनी रॉयची लगीनघाई; कोण आहे मौनीचा जोडीदार?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha