झोपडपट्टीत आयुष्य घालवलेल्या मोनालिसाचं नशीब फळफळलं, बॉलिवूडनंतर आता साऊथमध्येही सिनेमा मिळाला
Monalisa viral girl : झोपडपट्टीत आयुष्य घालवलेल्या मोनालिसाचं नशीब फळफळलं, बॉलिवूडनंतर आता साऊथमध्येही सिनेमा मिळाला

Monalisa viral girl : म्हणतात ना, माणसाचं नशीब बदलायला एका मिनिटाचीही गरज नसते, फक्त योग्य वेळ हवा, स्टार फिरायला वेळ लागत नाही. ही म्हण महाकुंभ मेळातून प्रसिद्धीस आलेल्या मोनालिसासाठी अगदी तंतोतंत लागू होते. झोपडीत बालपण घालवणाऱ्या मोनालिसाने कधी कल्पनाही केली नसेल की एक दिवस ती चित्रपटसृष्टीचा भाग होईल. पण ते वास्तवात आलं आहे. बॉलिवूडनंतर आता मोनालिसाच्या झोळीत मल्याळम चित्रपट आला आहे. जाणून घेऊया तिचा साउथ डेब्यू कोणत्या हिरोसह होतो आहे.
मल्याळम सिनेमात मोनालिसाचा डेब्यू
महाकुंभ मेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसाचे दिवस आता बदलले आहेत. ती दिवसेंदिवस यशाच्या नवीन पायऱ्या चढत आहे. सोशल मीडिया सेंसेशन मोनालिसा आता मल्याळम चित्रपटात एंट्री घेण्याच्या तयारीत आहे. ती ‘नागम्मा’ नावाच्या मल्याळम चित्रपटातून साउथ इंडस्ट्रीचा भाग होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता कैलाश मुख्य भूमिकेत आहे. कैलाशला नीलाथमारा चित्रपटातील दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. Onmanorama च्या अहवालानुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन बीनू वर्गीस करीत आहेत तर निर्माते आहेत जीली जॉर्ज. चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
चित्रपटासाठी पूजा कुठे झाली?
मोनालिसा अभिनीत 'नागम्मा' या चित्रपटाची पूजा कोची येथे पार पडली. प्रख्यात दिग्दर्शक सिबी मलयिल या पूजेत सहभागी झाले आणि चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. सिबी यांना थानियावर्तनम, किरीदम, दशरथम आणि महामहिम अब्दुल्ला यांसारख्या क्लासिक चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जाते. दिग्दर्शक बीनू वर्गीस यांच्यासाठीही हा चित्रपट अत्यंत खास ठरणार आहे.
मोनालिसा कशी झाली फेमस?
महाकुंभच्या काळात माळा विकताना मोनालिसा चर्चेत आली होती. तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधले आणि क्षणातच तिचे व्हिडिओज लोकांमध्ये व्हायरल झाले. यामुळे बरीच वादविवादही झाले. त्यानंतर मोनालिसाचे नशीब रातोरात उजळले. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी त्यांच्या आगामी डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटात मोनालिसाला महत्त्वाची भूमिका दिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत झळकवल्यानंतर मल्याळम सिनेमात मोठा प्रोजेक्ट मिळणे ही मोनालिसासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कालपर्यंत लोकांसाठी जी मोनालिसा एक सर्वसामान्य मुलगी होती, आज ती सेलिब्रिटीचे आयुष्य जगत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या


















