एक्स्प्लोर
Ramraje Naik Nimbalkar On Phaltan Case : मी 77 वर्षाचा मला तुरुंगात टाका, तिथून थर्ड लावेन
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून, रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. 'जर षडयंत्रात माझा सहभाग असेल तर माझं नाव घेऊनच दाखवा, मी सत्याहत्तर वर्षांचा तुरुंगात टाका, तिथून थर्ट लावेन,' असा थेट इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. दुसरीकडे, या प्रकरणात आरोप होत असलेले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आज फलटणच्या गजानन चौकात एका सभेद्वारे आपली बाजू मांडणार आहेत. फलटणमध्ये घडलेली ही घटना अशोभनीय असल्याचे सांगत रामराजे यांनी, 'प्रल्हाद साळुंखे यांना हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही,' असेही म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली असून, आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















