Team India Victory Turning Point : ती वेळ अन् तो क्षण... टीम इंडिया वर्ल्डकप जिंकणार तिकडेच ठरलं; दक्षिण अफ्रिकेच्या 3 विकेट्स शिल्लक असताना नेमकं काय घडलं?
India Won Women's World Cup 2025 : भारतीय संघाने रविवारी (2 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी मात करून पहिल्यांदाच महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.

Amanjot Kaur Catch Laura Wolvaardt Turning Point Match : भारतीय संघाने रविवारी (2 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी मात करून पहिल्यांदाच महिला विश्वचषकाचे विजेतेपद (India Won Women's World Cup 2025) पटकावले. या सामन्यात अमनजोत कौरच्या (Amanjot Kaur) बॅट आणि बॉलमधून काही खास कामगिरी दिसली नाही, पण तिच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लॉरा वोल्वार्ट (Laura Wolvaardt) आणि ताजमिन ब्रिट्स या जोडीने दक्षिण आफ्रिकेला दमदार सुरुवात करून दिली. भारताला पहिला ब्रेकथ्रू 10व्या षटकात मिळाला, जेव्हा अमनजोतने मिडविकेटवरून थेट फेक मारत ब्रिट्सला शानदार रनआऊट केले. याशिवाय, अमनजोतने शतक झळकावणाऱ्या वोल्वार्टचा डीप मिडविकेटवरील अफलातून झेल घेतला आणि त्या क्षणी भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब झाले.
42व्या षटकात भारताकडून गोलंदाजीसाठी दीप्ती शर्मा आली. त्यावेळी दक्षिण अफ्रिकेच्या हातात 3 विकेट्स शिल्लक होत्या. दीप्तीच्या पहिल्याच चेंडूवर वोल्वार्टने मिड-ऑनच्या दिशेने उंच शॉट खेळला. चेंडूच्या खाली अमनजोत कौर धाव घेत पोहोचल्या, आधी चेंडू त्यांच्या हातातून दोनदा सुटला. पण शेवटी अमनजोतने एक हाताने अफलातून झेल घेतला आणि सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने वळवला. त्या कॅचनंतर मैदानात आनंदाचा जल्लोष उसळला. सर्व भारतीय खेळाडू अमनजोतकडे धावत गेले आणि जोरदार साजरा केला. कारण सगळ्यांना ठाऊक होतं की, हा कॅच त्या फलंदाजाचा होता जिने एकटीने सामना फिरवला असता.
An excellent effort from Amanjot Kaur has Laura Wolvaardt walking back to the dugout after anchoring the chase 🔥
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 2, 2025
Watch the #INDvSA Final LIVE in your region, #CWC25 broadcast details here 👉 https://t.co/MNSEqhJhcB pic.twitter.com/M9G7BIi0Bq
2025 च्या विश्वचषकात अमनजोत कौरची कामगिरी कशी होती?
या स्पर्धेत अमनजोत कौरच्या कामगिरीमध्ये सात सामन्यांमध्ये 36.50 च्या सरासरीने आणि 83.90 च्या स्ट्राईक रेटने 146 धावा केल्या. तिने सहा विकेट्सही घेतल्या.
भारत-दक्षिण अफ्रिकेचा अंतिम सामना कसा राहिला? (IND vs SA Womens World Cup Final 2025)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्मा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज ठरली. तिने 78 चेंडूत 87 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शेफालीने मानधना (45) सोबत 104 धावांची सलामी भागीदारी केली. दीप्ती शर्मानेही 58 चेंडूत 58 धावा केल्या, रिचा घोषने 24 चेंडूत 34 धावा केल्या, जेमिमाह रॉड्रिग्जने 24 आणि हरमनप्रीत कौरने 20 धावा केल्या.
भारताच्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्डने शतक केले. लॉरा वोल्वार्डने 98 चेंडूत 101 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 1 षटकार होता. तर अॅनेरी डिर्कसेनने 35, सन लुसने 25 आणि तंजीम ब्रिट्सने 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून दीप्ती शर्माने सामना फिरवून टाकणारी गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने उजव्या हाताच्या फिरकीपटूने 9.3 षटकांत 39 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. शेफाली वर्माने दोन आणि श्री चरणीने एक विकेट घेतली.
हे ही वाचा -
















