Mission Cinderella: अक्षय कुमारचा ‘मिशन सिंड्रेला’ थिएटरमध्ये रिलीज होणार नाही! जाणून घ्या नेमकं कारण काय...
Mission Cinderella : अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे जो दरवर्षी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित करतो. सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
Mission Cinderella : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त हा अभिनेता यावर्षी इतर अनेक चित्रपटांमध्येही दिसणार आहे. अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे जो दरवर्षी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित करतो. सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, आता अक्षय कुमारच्या आणखी एका चित्रपटाशी संबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे.
वास्तविक, अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘मिशन सिंड्रेला’ (Mission Cinderella) खूप महागात विकला गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar ने ‘मिशन सिंड्रेला’ हा चित्रपट 135 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी यांनी केली आहे आणि अक्षय कुमारच्या बेल बॉटमचे दिग्दर्शन रणजीत एम तिवारी यांनी केले आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतला चित्रपट!
विशेष म्हणजे हा तोच चित्रपट आहे, ज्याच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या आईचा मृत्यू झाला होता. जेव्हा त्याच्या आईने जगाचा निरोप घेतला, तेव्हा अभिनेता चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होता. अक्षयचा ‘मिशन सिंड्रेला’ हा दक्षिणेकडील सुपरहिट चित्रपट ‘रक्तसन’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने हा चित्रपट विकत घेतल्यानंतर आता चित्रपटगृहांऐवजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणारा ‘मिशन सिंड्रेला’ हा अक्षयचा पहिला चित्रपट नाही. याआधीही अभिनेत्याचे 'लक्ष्मी' आणि 'अतरंगी रे' हे चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाले होते. या सगळ्याशिवाय हा अभिनेता लवकरच अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटांमध्ये ‘पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’, ‘गोरखा’, ‘ओह माय गॉड 2’,’ सेल्फी’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांचा समावेश आहे.
डिजिटल डेब्यूच्या तयारीत अक्षय
याशिवाय अक्षय कुमारही लवकरच डिजिटल डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. अभिनेता लवकरच अॅमेझॉन प्राइम सीरीज 'द एंड'मध्ये दिसणार आहे. मात्र, त्यांनी अद्याप त्यावर काम सुरू केलेले नाही. त्याचवेळी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाबद्दल सांगायचे, तर हा चित्रपट 18 मार्चला चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिस देखील दिसणार आहेत. याशिवाय अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंह हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.
हेही वाचा :
- Majha Katta : 'मी जात मानत नाही', सोशल मीडियावरच्या टीकेला नागराजचं उत्तर
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Virajas Kulkarni : व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून… 'व्हिक्टोरिया'साठी विराजसची खास पोस्ट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha