एक्स्प्लोर

Mirzapur Season 4 :  'मुन्ना भैय्या'च्या एन्ट्रीचा मार्ग मोकळा! कसं होणार धमाकेदार कमबॅक? जाणून घ्या सविस्तर 

Mirzapur Season 4: मिर्झापूरच्या चौथ्या सिझनमध्ये मुन्ना भैय्याच्या एन्ट्रीचा मार्ग मोकळा झाला असल्याचं म्हटलं जात आहे. 

Mirzapur Season 4: सध्या ओटीटीवर एका सिरिजची बरीच चर्चा सुरु आहे. मिर्झापूर सिझन 3 (Mirzapur Season 3) हा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. मागील चार वर्षांपासून प्रेक्षक या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. पण या सिझनचं कथानक काहीसं प्रेक्षकांना पसंतीस पडलं नसल्याचं म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे मुन्ना भैय्या नसल्यामुळे अनेकांनी या सिरिजवर नाराजी व्यक्त केली आहे.  

या सिझनमध्ये प्रेक्षकांनी मुन्ना भैय्याला सर्वात जास्त मिस केलं. कालिन भैय्यानंतर मुन्ना भैय्या देखील या मालिकेतील महत्त्वाचा भाग होता. नुकतच अली फजलने मिर्झापूरच्या चौथ्या सिझनविषयी अपडेट दिले आहेत. अशाच परिस्थितीमध्ये पुढच्या सिझनमध्ये मुन्ना भैय्याचा प्रवेश कसा होईल, याबाबत चाहते फार उत्सुक आहे. 

मुन्ना भैय्याला परत आणण्यासाठी चाहत्यांनी सुचवली आयडिया!

मिर्झापूर सीझन 3 च्या पहिल्याच सीनमध्ये जेव्हा मुन्ना भैय्याचा मृतदेह आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार दाखवण्यात आले तेव्हा चाहत्यांना फार वाईट वाटलं. त्यामुळे तिसऱ्या सिझनमध्ये मुन्ना भैय्या दिसणार नाही हे स्पष्ट झालं. मुन्ना भैय्याचं पात्र संपवल्यामुळे लोकांना तिसरा सिझन बघावासा वाटला नाही, असंही अनेकजण म्हणत आहे. त्यामुळे आता चाहत्यांनी अनेक आयडिया सांगितल्या आहेत, ज्यामुळे मुन्ना भैय्याची सिझनमध्ये पुन्हा एन्ट्री होऊ शकते. 

अशी होऊ शकते मु्न्ना भैय्याची एन्ट्री

मुन्ना भैय्याच्या एन्ट्रीसाठी एकाने आयडिया देत म्हटलं की, चौथ्या सिझनमध्ये कालिन भैय्याची बायको बिना भाभी आणि तिचा मुलगा म्हणून मुन्ना भैय्या चौथ्या सिझनमध्ये दिसू शकतो. त्यामुळे चौथ्या सिझनमध्ये बिना भाभाच्या मुलाच्या भूमिकेत मुन्ना भैय्या दिसू शकतो. 

मिर्झापूरचा चौथा सीझन येणार?

चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या मिर्झापूरच्या या सीझनला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांना ही सीरीज आवडली आहे, तर अनेक चाहत्यांच्या ती पचनी पडलेली नाहीय. काही प्रेक्षकांच्या मते, मागील दोन सीझनच्या तुलनेत तिसरा सीझन खास नाही. पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या दमदार भूमिका असूनही, ज्यांनी मिर्झापूर 3 पाहिला आहे त्यांना आता चौथ्या सीझनची वाट पाहावी लागणार असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. 

मिर्झापूर सीझन 4 संभाव्य रिलीझ डेट 
मिर्झापूरच्या पुढील सीझनबाबत कोणतीही अपडेट आतापर्यंत समोर आलेली नाही. पण, चाहत्यांना याच्या पुढील चौथ्या सीझनची अपेक्षा आहे. मिर्झापूर वेब सीरीजच्या प्रत्येक सीझनमध्ये लक्षणीय अंतर आहे. मिर्झापूरचा पहिला सीझनचा 16 नोव्हेंबर 2018 रोजी प्रदर्शित झाला होता, त्यानंतर मिर्झापूरचा दुसरा सीझन 23 ऑक्टोबर 2020 रोजी आणि आताचा मिर्झापूरचा तिसरा सीझन 5 जुलै 2024 रोजी प्रदर्शित झाला. या पॅटर्नचा विचार करता, चाहत्यांना मिर्झापूरच्या पुढील सीझनसाठी अंदाजे दोन ते तीन वर्षांची वाट पाहावी लागू शकते. या अंदाजानुसार, मिर्झापूर सीझन 4  2026 किंवा 2027 पर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी वाचा : 

Mirzapur 4 : मिर्झापूरच्या चौथ्या सीझनमध्ये मुन्ना भैय्या कमबॅक करणार? रिलीज डेटची चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगेLaxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडेDhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget