(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MC Tod Fod : 'चार महिन्यात दोन ह्रदयविकाराचे झटके, त्यानंतर सर्जरी, पण तो... ; रॅपर MC Tod Fod च्या आईची माहिती
MC Tod Fod : धर्मेशच्या आईनं त्याच्या प्रकृतीबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले.
MC Tod Fod : रॅपर धर्मेश परमार (Dharmesh Parmar) उर्फ एमसी तोड फोड (MC Tod Fod)चे निधन झाले आहे. त्यानं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक कलाकारांनी तसेच धर्मेशच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला श्रद्धांजली वाहिली. धर्मेशच्या आईनं त्याच्या प्रकृतीबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
एका मुलाखतीमध्ये धर्मेशच्या आईनं सांगितलं, 'धर्मेशला दोन ह्रदयविकाराचे झटके आले होते. जेव्हा तो लडाखमध्ये त्याच्या मित्रांसोबत ट्रिपला गेला होता तेव्हा त्याला ह्रदयविकाराचा पहिला झटका आला. काही महिन्यांपूर्वी तो घरी असताना त्याला दुसरा ह्रदयविकाराचा झटका आला. त्याची हार्ट सर्जरी देखील झाली. पण त्यानंतर त्यानं कधीच आराम केला नाही. त्यानं स्वत:च्या आयुष्यापेक्षा म्युझिकवर आणि रॅपवर जास्त प्रेम केलं. मला असं वाटतं की मी त्याला वाचवण्यासाठी काहीच केलं नाही. '
पुढे त्या म्हणाल्या, 'नाशिकला जाण्याआधी त्याला कदाचित माहित होतं की तो घरी परत येणार नाही. म्हणून त्यानं होळी आधीच रक्षाबंधनचा सण साजरा केला. त्याला दोन बहिणी आहेत. मला माहित नाही त्यानं असा विचार का केला पण त्यानं त्याच्या काकूच्या मुलीकडून आणि दोन बहिणींकडून राखी बांधून घेतली. '
आठ मार्च रोजी धर्मेशचा ‘ट्रुथ अँड बास' हा अल्बम प्रदर्शित झाला होता. या अल्बमला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रणवीर सिंहच्या गली बॉय या चित्रपटाचा साउंडट्रॅक देखील धर्मेशनं गायला होता.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Vivek Agnihotri,Pallavi Joshi : तीन वर्ष डेट केल्यानंतर घेतला लग्न करण्याचा निर्णय; पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची लव्ह स्टोरी माहितीये?
- MC Tod Fod : 'गली बॉय' रॅपर MC Tod Fod चे वयाच्या 24 व्या वर्षी निधन; रणवीर अन् सिद्धांतनं वाहिली श्रद्धांजली
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha