MC Tod Fod : 'गली बॉय' रॅपर MC Tod Fod चे वयाच्या 24 व्या वर्षी निधन; रणवीर अन् सिद्धांतनं वाहिली श्रद्धांजली
धर्मेश परमार (Dharmesh Parmar) नं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
![MC Tod Fod : 'गली बॉय' रॅपर MC Tod Fod चे वयाच्या 24 व्या वर्षी निधन; रणवीर अन् सिद्धांतनं वाहिली श्रद्धांजली mc tod fod passes away ranveer singh Siddhant Chaturvedi mourns MC Tod Fod : 'गली बॉय' रॅपर MC Tod Fod चे वयाच्या 24 व्या वर्षी निधन; रणवीर अन् सिद्धांतनं वाहिली श्रद्धांजली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/22/6e14bc627f8721715f50c6de114f8a1f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MC Tod Fod Passes Away : रॅपर धर्मेश परमार (Dharmesh Parmar) उर्फ एमसी तोड फोड (MC Tod Fod)चे निधन झाले आहे. त्यानं वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून धर्मेशला श्रद्धांजली वाहिली आहे.
रणवीर सिंहच्या गली बॉय या चित्रपटाचा साउंडट्रॅक धर्मेशनं गायला होता. तसेच स्वदेशी नावाच्या सिंगिंग बँडमध्ये धर्मेश सहभागी होता. स्वदेशी बँडने धर्मेशच्या निधनाची माहिती दिली. रणवीर सिंह आणि सिद्धांत चतुर्वेदीनं धर्मेशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच रॅपर रफ्तारनं देखील धर्मेशला श्रद्धांजली वाहिली.
स्वदेशी बँडनं स्वदेशी मेलामधील धर्मेशच्या परफॉर्मन्सचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
आठ तारखेला धर्मेशचा ‘ट्रुथ अँड बास' हा अल्बम प्रदर्शित झाला होता. या अल्बमला प्रेक्षकांची पसंती मिळाली. फार कमी वयात धर्मेशनं विशेष लोकप्रियता मिळवली.
महत्वाच्या बातम्या
- Ananya Panday : कपड्यांवरून ट्रोल झाली अनन्या पांडे , वडील चंकी पांडे आले मदतीला धावून
- Madhuri Dixit: मुंबईमध्ये माधुरीनं घेतलं आलिशान घर; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
- Runway 34 Trailer: एक विमान, खराब हवामान आणि अचानक लँडिंग! अजय देवगणच्या ‘Runway 34’चा ट्रेलर पाहिलात?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)