लहानपणी लाजाळू, अनाथ आश्रमात वाढली, कारखान्यातही काम केलं, marilyn monroe च्या आयुष्यातील 10 रहस्य
Marilyn Monroe : लहानपणी लाजाळू, अनाथ आश्रमात वाढली, कारखान्यातही काम केलं, marilyn monroe च्या आयुष्यातील 10 रहस्य

Marilyn Monroe : मर्लिन मुनरो (Marilyn Monroe) अमेरिकेतील दिग्गज मॉडेल, अभिनेत्री आणि गायिका देखील होती. विसाव्या शतकातील सर्वात प्रसिद्ध महिला म्हणून मर्लिन मुनरोला ओळखलं जातं. सौंदर्य आणि यशाव्यतिरिक्त तिच्या धाडसीपणासाठी देखील मर्लिन ओळखली जात असे. मर्लिनने (Marilyn Monroe) कॅमेरासमोर दिलेल्या पोझ देखील चर्चेचा विषय असतात. मर्लिनची (Marilyn Monroe) आज देखील हॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली अभिनेत्री अशी ओळख आहे. अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालेली मर्लिन मुनरो लहानपणी लाजाळू असल्याचं बोललं जातं. मात्र, मोठी झाल्यावर तिच मर्लिन बिंधास्त गर्ल बनली.
मर्लिनचं बालपण अनाथ आश्रमात, अनेक कटू आठवणी
मर्लिनचा जन्म 1 जून 1923 रोजी 'नॉर्मा जीन मॉर्टन्सन' म्हणून झाला. तिच्या आईचे नाव ग्लेडिस पर्ल बेकर होते. तिचे नाव नॉर्मा बेकर असे ठेवण्यात आले. तिची आई मानसिकदृष्ट्या अस्थिर होती, म्हणून पहिली सहा वर्षे मर्लिनचे संगोपन कॅलिफोर्नियातील हॉथॉर्न येथे अल्बर्ट आणि इडा बुलँडर यांनी केले. नंतर आईने मर्लिनला परत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या मानसिक असंतुलनामुळे मर्लिनला तिच्या स्वाधीन करण्यात आले नाही. यामुळेच मर्लिनला तिच्या बालपणात अनेक वर्षे अनाथाश्रमात राहावे लागले. एका वेदनादायक बालपणामुळे तो अत्यंत लाजाळू आणि व्यक्त न होणारी बनली होती.
कारखान्यात काम करत असताना फोटोशूटमुळे मिळाली ओळख
1942 मध्ये, तिच्या 16 व्या वाढदिवसानंतर, मर्लिनने तिचा शेजारी जेम्स डगर्टीशी लग्न केले आणि ती गृहिणी बनली. पण ती तिच्या आयुष्यावर समाधानी नव्हती. 1943 मध्ये, तिचा नवरा मर्चंट नेव्हीमध्ये सामील झाला आणि लवकरच हे जोडपे वेगळे झाले. पैसे कमवण्यासाठी, मर्लिनने कॅलिफोर्नियातील बर्बँक येथील एका स्थानिक कारखान्यात काम करायला सुरुवात केली. इथेच मर्लिनला तिचा पहिला मोठा ब्रेक मिळाला. त्यावेळी, डेव्हिड कोनोव्हर नावाचा एक प्रेस फोटोग्राफर महिलांचे काम दाखवण्यासाठी कारखाना कव्हर करत होता. तो मर्लिनच्या सौंदर्याने आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाला आणि त्याने त्याच्या अनेक छायाचित्रांमध्ये तिचा चेहरा वापरला.
मॉडेल म्हणून करिअर सुरू केल्यानंतर मर्लिन लवकरच यशस्वी झाली. ती अनेक मासिकांच्या मुखपृष्ठांवरही दिसू लागली. 1946 हे वर्ष मर्लिनसाठी महत्त्वाचे ठरले. या वर्षी तिने तिच्या पतीला घटस्फोट दिला आणि तिचे नाव नॉर्मा बेकर वरून मर्लिन मनरो असे बदलले. त्याने अभिनयाचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि लवकरच तिला ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्सकडून पहिला चित्रपट ऑफर करण्यात आला. तिचे सुरुवातीचे चित्रपट काही खास नव्हते, पण या सुरुवातीच्या चित्रपटांमुळे तिला पुढे अनेक प्रमुख भूमिका मिळाल्या. त्यानंतर मर्लिन जगभर प्रसिद्ध झाली. आता ती हॉलिवूड, ग्लॅमर आणि फॅशन आयकॉन बनली होती.
मर्लिनने 1954 मध्ये बेसबॉल स्टार जो डिमॅगिओशी लग्न केले. मर्लिन आता हॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक होती पण तिचा करार अजूनही जुना होता. या जुन्या करारामुळे त्याला इतर स्टार्सपेक्षा कमी पैसे दिले जात होते. मात्र, काही काळानंतर तिच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आणि जास्त पगारही देण्यात आला. सप्टेंबर 1954 मध्ये तिने 'द सेव्हन इयर इच' मध्ये भूमिका साकारली. तिच्या या चित्रपटाने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले.
ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचे दावे
मर्लिनने 1955 मध्ये फॉक्स कामासाठी अधिकचं स्वातंत्र्य द्यावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर तिने स्वतःचे चित्रपट निर्माण करण्यास सुरू केली. 1956 मध्ये 'बस स्टॉप' साठी तिला गोल्डन ग्लोब सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. 1959 मध्ये 'सम लाईक इट हॉट' साठी तिला गोल्डन ग्लोब देखील मिळाला होता. दरम्यानच्या काळात तिचे डिमॅगिओशी असलेले संबंध बिघडले. मर्लिनने त्याला घटस्फोट दिला आणि यहुदी धर्म स्वीकारला आणि आर्थर मिलरशी लग्न केले. 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला तिची तब्येत बिघडू लागली. मर्लिनला ड्रग्जचे व्यसन लागले असल्याचे मानले जाते. तिचा मिलरसोबतचे वैवाहिक संबंध संपुष्टात आले होते. 1962 मध्ये मर्लिनला व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जे.एफ. केनेडी यांच्या वाढदिवसानिमित्त गाण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वर्षी वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मर्लिनचे निधन झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















