एक्स्प्लोर

Gadad Movie : समुद्राच्या खोल तळाशी असलेलं रहस्य लवकरच उलगडणार; 'गडद' चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच

Gadad Movie : 'गडद' या चित्रपटाचं लक्ष वेधून घेणारं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं.

Gadad Movie : मराठी चित्रपटामध्ये प्रेक्षकांना प्रथमच स्कूबा डायव्हिंग पहायला मिळणार आहे. अंडरवॉटर शूट केलेला सिनेमा सिल्व्हर स्क्रीनवर दिसणार आहे. हॉलिवूड तसंच बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण यापूर्वी स्कूबा डायव्हिंग पाहिलं आहे, पण 'गडद' या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं ते प्रथमच मराठी चित्रपटाच्या पडद्यावर दिसणार आहे. 'गडद' या चित्रपटाचं लक्ष वेधून घेणारं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. याप्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी 'गडद'च्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शक प्रज्ञेश कदम या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून, लेखनही त्यांनीच केलं आहे. प्रज्ञेशचा हा दिग्दर्शकाच्या रूपातील पहिलाच चित्रपट आहे. पदार्पणातच त्यांनी स्कूबा डायव्हिंगसह शूटिंग करण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर लगेचच मालदिव्ज आणि गोव्यात शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी चित्रपटात प्रथमच प्रेक्षकांना पाण्याखालचा गडद रंग पहायला मिळणार आहे. चित्रपटाचं शीर्षक आणि रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरवरून यात नेमकं कशा प्रकारचं कथानक पहायला मिळणार याचा जराही थांगपत्ता लागत नाही. त्यामुळं या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. सध्या मराठीत सुरू असलेल्या ट्रेंडपेक्षा 'गडद' हा चित्रपट आपले काहीसे वेगळे रंग दाखवणार असल्याचे संकेत मात्र पोस्टरवरून नक्कीच मिळतात. 

मिताली मयेकर, सुयोग गोऱ्हे, शुभांगी तांबाळे, नितीन गावंडे, आरती शिंदे आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. संगीत रोहित श्याम राऊतचं आहे, तर सिनेमॅटोग्राफी वेंकटेश प्रसाद करणार आहे. मंदार लालगे आणि नितीन गावंडे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर असून, प्रवीण वानखेडे कार्यकारी निर्माते आहेत. अभिषेक खणकर यांनी 'गडद'साठी गीतलेखन केलं असून, आदिनाथ पोहनकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. कॅास्च्युम किरण बुराडे यांनी केले आहेत.

हेही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
Deeol Band 3 Update Pravin Tarde: 'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
'देऊळ बंद'चा तिसरा पार्ट अमेरिकेत! श्री स्वामी समर्थांची भक्ती थेट परदेशात गाजणार; लेटेस्ट अपडेट समोर
Ayali Webseries ZEE5 : मासिक पाळी येताच लग्न, पण तरुणीला शिकायची इच्छा, प्रथेमुळे... 8 भागांची 'ही' वेब सिरीज तुमचं डोकं चक्रावून सोडेल
मासिक पाळी येताच लग्न, पण तरुणीला शिकायची इच्छा, प्रथेमुळे... 8 भागांची 'ही' वेब सिरीज तुमचं डोकं चक्रावून सोडेल
Mohan Joshi On Hindi Film Industry: 'हिंदी इंडस्ट्रीत मित्र बनवले नाहीत, पण मराठीत...', मोहन जोशींनी सांगितला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा 'तो' अनुभव
'हिंदी इंडस्ट्रीत मित्र बनवले नाहीत, पण मराठीत...', मोहन जोशींनी सांगितला बॉलिवूडमध्ये काम करण्याचा 'तो' अनुभव

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा भावनिक विद्यानंद बापट यांना फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती
BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Embed widget