एक्स्प्लोर

Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta: 'अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी...', पाठमोरी बसलेली हिरोईन अन् तिनं विचारलेला 'तो' प्रश्न; भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता'मधली प्रेमकहाणी

Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta: युवान प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या 'कढीपत्ता' चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे. कथा लेखन आणि दिग्दर्शन विश्वा यांनी केलं आहे.

Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta: आजवर बऱ्याच प्रेमकथांनी रसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. त्यामुळेच निर्माते-दिग्दर्शकही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील प्रेमकथा रसिकांसमोर सादर करत असतात. 'कढीपत्ता' (Kadi Patta) या आगामी मराठी चित्रपटातही (Marathi Movie) प्रेक्षकांना एक अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. 'अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी' अशी या चित्रपटाच्या शीर्षकाला देण्यात आलेली टॅगलाईन उत्सुकता वाढवणारी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नव्या दमाचे निर्माता आणि दिग्दर्शकाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला एक युथफुल लव्ह स्टोरी घेऊन आले आहेत. 7 नोव्हेंबर रोजी 'कढीपत्ता' (Kadi Patta Marathi Movie) हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

युवान प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या 'कढीपत्ता' चित्रपटाची निर्मिती स्वप्नील युवराज मराठे यांनी केली आहे. कथा लेखन आणि दिग्दर्शन विश्वा यांनी केलं आहे. निर्माते स्वप्नील युवराज मराठे आणि दिग्दर्शक विश्वा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच प्रयत्नांत दोघांनीही एक संगीतप्रधान प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मोशन पोस्टरवर निसर्गरम्य वातावरणात बसलेली नायक-नायिकेची जोडी आहे. चित्रपटात भूषण पाटील मुख्य भूमिकेत आहे, पण नायिका पाठमोरी बसलेली आहे. 

पाठमोरी बसलेल्या नायिकेचे संवाद खूप मार्मिक आहेत. ती म्हणते की, "ए तुला आठवतं बाबांनी आपल्याला कढीपत्त्याचं महत्त्व सांगितलं होतं. आपण त्याचे गुणधर्म विसरतो आणि फक्त त्याचा उपयोग लक्षात ठेवतो. उपयोग हा क्षणभरासाठी असतो, पण मी तुला एक सांगू का, त्याचा गुणधर्म हा कायमचा राहतो. हाच उपयोग आणि गुणधर्म यातील फरक नक्की काय असतो, तेच आपल्याला कळत नाही." या चित्रपटात भूषणची नायिका कोण, हे रहस्य सध्या तरी गुलदस्त्यात आहे. त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढते. लवकरच 'कढीपत्ता'मधील नायिकेचा चेहरा रिव्हील केला जाणार आहे. 

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक विश्वा म्हणाले की, या चित्रपटात खऱ्या अर्थानं अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आजच्या काळातील तरुणाई, त्यांची मते, विचार, भावना, नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि एकूणच त्यांच्या भावविश्वाची सुरेख गोष्ट या चित्रपटात आहे. प्रेमकथेला सुरेल गीत-संगीताची जोड देत 'कढीपत्ता'च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असणारा चित्रपट रसिकदरबारी सादर केला आहे. आजवर अनेक प्रेमकथा आल्या असल्या तरी यातील विषय आणि पैलू कधीही समोर आलेले नाहीत. चित्रपटाला देण्यात आलेली ट्रीटमेंटही खूप वेगळी असल्याने प्रेक्षकांना एक वेगळ्या वाटेवरील चित्रपट पाहिल्याची अनुभूती 'कढीपत्ता' नक्कीच देईल असेही विश्वा म्हणाले. निर्माता म्हणून आमचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी पदार्पणाताच एक आशयघन-संगीतप्रधान कलाकृती तयार केल्याचे समाधान लाभल्याचे निर्माते स्वप्नील मराठे यांचे म्हणणं आहे.

या चित्रपटात अक्षय टांकसाळे, संजय मोने, शुभांगी गोखले, गार्गी फुले, आनंदा कारेकर, गौरी सुखटणकर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. याखेरीज आनंद इंगळे आणि चेतना भट पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसतील. छायांकन अनिकेत खंडागळे यांनी केले असून वितरणाची जबाबदारी सिनेपोलीस सांभाळणार आहे. संयुक्ता सुभाष या चित्रपटाच्या प्रोजेक्ट हेड, तर विशाल चव्हाण कार्यकारी निर्माते आहेत. गीतकार मंदार चोळकर, मुकुंद भालेराव, विनू सांगवान यांनी लिहिलेली गीते संगीतकार पद्मनाभ गायकवाड आणि आशिष खांडल यांनी रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, अनन्या वाडकर, साज भट्ट, प्रियांशी श्रीवास्तवा यांच्या आवाजात संगीतबद्ध केली आहेत. पार्श्वसंगीत तन्मय भिडे यांनी दिले असून, संकलन ऋषीराज जोशी यांनी केले आहे. पल्लवी पाटील आणि गार्गी पाटील यांनी वेशभूषा केली असून, किरण सावंत यांनी रंगभूषा केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

लग्नाआधीच गरोदर राहिलेली 'ही' मुस्लिम हिरोईन, हिंदू क्रिकेटरसोबत बांधलेली लग्नगाठ; अचानक कुठे गायब झाली 'छोटी माधुरी'?

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget