लग्नाआधीच गरोदर राहिलेली 'ही' मुस्लिम हिरोईन, हिंदू क्रिकेटरसोबत बांधलेली लग्नगाठ; अचानक कुठे गायब झाली 'छोटी माधुरी'?
Muslim Actress Farheen Khan Married With Hindu Crickter: 1992 मध्ये आलेल्या 'जान तेरे नाम' या कल्ट हिट चित्रपटातून 'छोटी माधुरी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीनं पदार्पण केलं.

Muslim Actress Farheen Khan Married With Hindu Crickter: 90 च्या दशकातील एक अशी अभिनेत्री (Bollywood Actress), जी रातोरात स्टार झाली. तिचं हसणं आणि चेहरा हुबेहुब अगदी माधुरी दीक्षितसारखा (Actress Madhuri Dixit), म्हणूनच तिला 'छोटी माधुरी' म्हणून ओळखली जाऊ लागली. फारच कमी वेळात या मुस्लीम अभिनेत्रीनं (Muslim Actress) यशाचं सर्वोच्च शिखर गाठलेलं. पण, अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके सिनेमे करुन ती इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली. पण, तेव्हापासून ती आहे कुठे आहे? करते काय? हे सविस्तर जाणून घेऊयात.
बॉलिवूडचं (Bollywood) झगमगतं जग... 90 चं दशक... आणि एक मुस्लिम अभिनेत्री. या अभिनेत्रीला केवळ तिच्या अभिनयानं आणि क्लासी अदांमुळेच नाहीतर माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) साम्या असल्यामुळेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव फरहीन खान (Farheen Khan). नव्वदच्या दशकात या अभिनेत्रीला छोटी माधुरी म्हणून ओळखलं जायचं. त्यासोबतच तिचं पर्सनल लाईफसुद्धा फार चर्चेत होतं. ही अभिनेत्री लग्नापूर्वीच गरोदर राहिली. त्यानंतर तिनं एका हिंदू क्रिकेटपटूसोबत (Hindu Cricketers) लग्न केलं.
'जान तेरे नाम'मधून रातोरात झाली स्टार
1992 मध्ये आलेल्या 'जान तेरे नाम' या कल्ट हिट चित्रपटात फरहीन खाननं रोनित रॉयसोबत (Ronit Roy) स्क्रिन शेअर केलेली. पदार्पणातच फरहीन खाननं अख्खी इंडस्ट्री हादरवून टाकलेली. ती रातोरात स्टार झाली. तिचं गोड हास्य आणि डान्स स्टेप्समुळे तिनं सहज आपलं स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केलं. चाहते तिला डिट्टो माधुरी दीक्षित म्हणायचे. म्हणूनच पुढे तिला 'छोटी माधुरी' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिचा पहिला चित्रपटच त्या दशकातील रोमँटिक हिट चित्रपटांपैकी एक बनला. आजही लोकांना त्या सिनेमातली गाणी आठवतात.

पण, मोजकेच सिनेमे केल्यानंतर फरहीन खान अचानक गायब झाली
एकीकडे, फरहीन खानची कारकीर्द यशाच्या सर्वोच्च शिखरावर होती, तर दुसरीकडे, तिनं एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे तिचं आयुष्य पुर्णपणे बदलून टाकलं. तिनं एका हिंदू क्रिकेटपटूशी लग्न केलं. त्यांचं नाव मनोज प्रभाकर. फरहीनसोबतचं मनोज यांचं दुसरं लग्न होतं, तर त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून एक मूल होतं. मिडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज फरहीनच्या प्रेमात पडला होता. तो तिच्या प्रेमात पडला आणि त्यांनी 1994 मध्ये लग्न केलं. पण, त्यावेळी मोठ्या चर्चा रंगलेल्या की, फरहीन लग्नाआधीच गरोदर होती.
फरहीन खाननं 5 वर्षांत तब्बल 17 सिनेमे केले. त्यावेळी माधुरी, दिव्या भारती, काजोल, करिश्मा कपूर आणि रवीना टंडन सिल्वर स्क्रिन गाजवत होत्या. पण, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही फरहीन अचानक कुठेतरी गायब झाली. मिडिया रिपोर्टनुसार, आपला संसार आणि कुटुंबासाठी फरहीननं स्वतःला रुपेरी पडद्यापासून दूर केलं.
फरहीन खाननं साऊथ इंडस्ट्रीतही काम केलंय...
हिंदी व्यतिरिक्त, फरहीननं कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं. दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये तिला 'बिंदिया' म्हणून क्रेडिट दिलं जातं. फरहीन आणि मनोज यांना दोन मुलं आहेत. त्यांची नावं राहिल आणि मनवंश आहेत. फरहीन आणि मनोज दोघेही प्रसिद्धीपासून दूर दिल्लीत राहतात. मनोज यांची पहिली पत्नी आणि तिचा मुलगा रोहनसुद्धा त्यांच्यासोबतच राहतात.
...तर शाहरुखच्या 'बाजीगर'मध्ये दिसली असती फरहीन खान
फरहीनला शाहरुख खानसोबत 'बाजीगर' चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली होती. पण तिनं ती नाकारली. नंतर ही भूमिका शिल्पा शेट्टीनं साकारली आणि ती रातोरात प्रसिद्ध झाली. फरहीन खाननं 2014 मध्ये सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. तेही 'जान तेरे नाम'च्या सिक्वेलद्वारे... 2022 पासून ती दोन प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























