नॅशनल अवॉर्ड जिंकल्यानंतर मिळालेली रक्कम मनोज कुमार यांनी शहीद भगतसिंगांच्या कुटुंबियांनी दिली होती
manoj kumar : नॅशनल अवॉर्ड जिंकल्यानंतर मिळालेली रक्कम मनोज कुमार यांनी शहीद भगतसिंगांच्या कुटुंबियांनी दिली होती

manoj kumar : अभिनेते मनोज कुमार यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांनी अनेक सिनेमात साकारलेल्या आयकॉनिक भूमिका आजही लोक तितक्याचं आवडीने पाहातात. त्यांच्या देशभक्तीपर सिनेमांमुळे त्यांना 'भारत कुमार' म्हणून देखील ओळखलं जात होतं. मनोज कुमार यांच्या शहीद या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांनी या सिनेमात कॉम्रेड शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. या पुरस्काराची रक्कम अभिनेते मनोज कुमार यांनी शहीद भगतसिंग यांच्या कुटुंबियांना दिली होती. हे पाऊल उचलत त्यांनी शहीद भगतसिंग यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती.
View this post on Instagram
जानेवारी 1965 रोजी प्रदर्शित झाला होता शहीद सिनेमा
एस राम शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला शहीद हा सिनेमा 1 जानेवारी 1965 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये त्या काळातील मनोज कुमार, कामिनी कौशल, प्राण, प्रेम चोप्रा, मनमोहन, मदन पुरी आणि करण दिवाण असे अनेक जबरदस्त कलाकार होते. शहीद हा सिनेमा मनोज कुमार यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण सिनेमा होता. त्यांनी शहीद भगतसिंगांची भूमिका साकारुन कित्येक प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
सत्यजित रे यांच्याशी झालेला भेटीचा किस्सा
मनोज कुमार यांनी लेजेंड सत्यजित रे यांच्या भेटीचा किस्सा देखील सांगितला होता. सत्यजित रे त्यांना माणिकदा म्हणत असायचे. दोघांनी 'उपकार' (१९६७) आणि रे यांचा 'चारुलता' (1964) या चित्रपटावर चर्चा केली. "मी त्यांना विचारले की त्यांनी माझा 'उपकार' चित्रपट पाहिला आहे का? त्यांनी सांगितले की त्यांनी पाहिला आहे, पण तो मेलोड्रॅमिक वाटला."
अभिनेते मनोज कुमार यांचं शुक्रवारी (दि.4) निधन झालं. मुंबईतील कोकिलाबेन धिरुबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 87 वर्षीय वृद्ध गेल्या काही काळापासून यकृताच्या सिरोसिसमुळे आजारी होते. देशभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, अभिनेत्याने उपकार (1967), रोटी कपडा और मकान (1974), शोर (1972), क्रांती (1981), आणि पूरब और पश्चिम (1970) यासारख्या अनेक प्रभावशाली चित्रपटांमध्ये काम केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या























