एक्स्प्लोर

Mamta Kulkarni Controversial Statement On Dawood Ibrahim: 'दाऊद दहशतवादी नाही, त्यानं देश विघातक कृत्य केलेली नाहीत...'; दिग्गज अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ

Mamta Kulkarni Controversial Statement On Dawood Ibrahim: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Mamta Kulkarni Controversial Statement On Dawood Ibrahim: नव्वदच्या दशकातली ग्लॅमरस अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) नेहमीच वादाच्या भोवऱ्यात दिसलीय. तिचं आयुष्य घोटाळे, अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या अफवांमुळे चर्चेत आलेलं. पडद्यावर साकारलेल्या बोल्ड भूमिका आणि स्क्रीन प्रेजेंसमुळे ममता कुलकर्णी अल्पावधीच प्रसिद्धीझोतात आली. पण, जेवढ्या लवकर ती प्रसिद्धीझोतात आली, तशीच अंडरवर्ल्डशी संबंध आणि एका कुख्यात ड्रग केसमध्ये नाव आल्यामुळे तिची प्रसिद्धी फिकी पडली. अशातच आता पुन्हा एकदा ममता कुलकर्णी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. त्यासाठी कारण ठरतंय तिनं केलेलं वक्तव्य. ममता कुलकर्णी म्हणाली आहे की, "दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) दहशतवादी नाही..."

ममता कुलकर्णीनं कित्येक वर्षांनंतर अंडरवर्ल्डच्या सर्वात मोठ्या डॉनचं नाव घेऊन एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ममता कुलकर्णी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, "दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही... आणि त्यानं बॉम्बस्फोटही घडवून आणलेले नाहीत... बॉम्बस्फोटासारख्या घटनांमध्ये त्याचं नाव कधीच आलेलं नाही. माध्यमं आणि काही राजकीय शक्ती यांनी कट रचून त्याला बदनाम केलंय... एखादी व्यक्ती गुन्हेगार असण्यासाठी तिच्यावर आरोप सिद्ध होणं गरजेचं असतं, फक्त प्रचार केल्यानं कुणीच गुन्हेगार ठरत नाही..." 

"दाऊदशी माझं काहीच देणं-घेणं नाही..."

ममता कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाली की, "दाऊदशी माझं काहीच देणंघेणं नाही... कुणा एखाचं नाव नक्कीच होतं... पण तुम्हीच पाहा, त्यानं बॉम्बस्फोट घडवून आणलेला नाही.  देश विघातक कृत्य केलेली नाहीत, ज्याच्यासोबत माझं नाव जोडलं गेलंय.... त्यानं कधीही बॉम्ब ब्लास्ट केलेला नाही... मी दाऊदला उभ्या आयुष्यात कधीच भेटेलेल नाही..."

अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध अन् ड्रग केसमध्ये आलेलं नाव... 

ममता कुलकर्णीच्या आयुष्यातील सर्वात चर्चेत असलेला एक पैलू म्हणजे, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी असलेले तिचे कथित संबंध. 1998 मध्ये, राजनसोबतच्या तिच्या संबंधांच्या अफवा पसरू लागल्या आणि त्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनल्या. 'चायना गेट'च्या सेटवर झालेल्या घटनेनंतर ममता कुलकर्णीचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध अधिक तीव्र झाले. राजकुमार संतोषीशी झालेल्या मतभेदानंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. राजनकडून धमक्या मिळाल्यानंतर पुन्हा ममता कुलकर्णीला सिनेमात घेतल्याचं बोललं जातंय.  चित्रपटाच्या अपयशामुळे तिला मोठा धक्का बसला आणि तिनं राजकुमार संतोषीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. 

ममता कुलकर्णी कोण? 

1990 च्या दशकात 'करण अर्जुन', 'कृष्णा', 'बाजी' आणि 'क्रांतिवीर' सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून स्टारडम मिळवणाऱ्या ममता कुलकर्णीला 'इट गर्ल' म्हणून ओळखलं जायचं. अल्पावधीतच कमालीचं स्टारडम मिळवूनही 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात ती अचानक गायब झाली. 2016 मध्ये, केनियामध्ये तिचा कथित पती विक्रम गोस्वामी (विक्की) याला अटक करण्यात आली, तेव्हा तिचं नाव ड्रग्ज तस्करी प्रकरणात समोर आलं. छोटा राजन आणि दाऊद गँगमधील शत्रुत्वात सहभागी असल्याचा आरोपही विक्कीवर असल्यानं दाऊदचं नावही यात आलं. पण, ममतानं हे आरोप सातत्यानं नाकारलेत. 2025 च्या कुंभमेळ्यापूर्वी ती भारतात परतली. तिच्या मते, तिनं 12 वर्ष तपश्चर्या केली. कुंभमेळ्यात तिनं संन्यास घेतला आणि 'माई ममता नंद गिरी' या नावानं आध्यात्मिक जीवन स्वीकारलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

TV Actress Nupur Alankar Left Showbiz: टेलिव्हिजनची सुपरस्टार, करिअर जोमात असतानाच सोडली इंडस्ट्री; आता बनलीय संन्यासी, भिक्षा मागून भरतेय पोट

महत्त्वाच्या बातम्या

72nd National Film Awards : 'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
'मु.पो. बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा, यामी गौतमी- मामूट्टी सर्वोत्तम कलाकार; 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
OTT Movies Webseries: कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
कोर्टरूम ड्रामा ते अंगावर काटा आणणारे क्राईम थ्रिलर; हे 5 पैसा वसूल चित्रपट-वेबसीरिज पाहिलेत का?
Hrithik Roshan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हृतिक रोशनची पोस्ट चर्चेत; शत्रुघ्न सिन्हांचेही सरकारला सवाल; नेमकं काय म्हणाले?
Paresh Rawal On Amitabh Bachchan: 'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'
'या वयात अमिताभ बच्चन करणार तरी काय?' परेश रावल स्पष्टच बोलले, 'व्ही.पी.सिंह प्रकरणानंतर ज्या प्रकारे टार्गेट केलं ..'

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget