Malaika Arora : उस्त्रासन, अंजनेयासन अन् शेवटी शीर्षासन... फिटनेसची सुंदरी मलायकाचा योगाचा व्हिडीओ व्हायरल
Malika Arora Yoga Video: मलायका अरोराने नुकताच योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वतःला रोज वेगवेगळे आव्हाने दिल्यानेच तुम्ही सामर्थ्यशाली बनू शकता असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
Malika Arora Shares Yoga Session Video : नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी मलायका तिच्या फिटनेसमुळेही चर्चेत असते. वयाची चाळीशी ओलांडलेली असूनही तिचा फिटनेस पाहून अनेक लोक हैराण राहतात. मलायका जेव्हा फिटनेसची एखादी पोस्ट किंवा व्हिडीओ टाकते तेव्हा कायमच तिच्या फिटनेसची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर होते. अशातच मलायकाने योगा करतानाचा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून तिचे फॅन्स हैराण झाले आहेत. या व्हिडीओखाली टाकलेले तिचे कॅप्शन अनेक लोकांना योगा करण्याकरता प्रेरित करू शकते.
मलायकाने शेअर केलेल्या व्हिडीओखाली लिहिले आहे की, "योगाभ्यास करून तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता." तसेच पुढे तिने लिहिले आहे , "तुमच्या प्रवासात
प्रगती करत राहा, पुढे जात राहा, तुम्ही कितीही वेळा हरलात तरीही उठून पुन्हा प्रयत्न करा. स्वत:ला रोज आव्हान दिल्याने तुम्हाला अधिक मजबूत आणि चांगले वाटेल." यावेळी योगा करताना तिने प्रिंटेड स्पोर्ट्स ब्रा आणि ट्राउजर घातलेली दिसत आहे.
मलायकाचा योगा करतानाचा खास व्हिडीओ
व्हिडीओच्या सुरूवातीलाच मलायका योगा व्हीलच्या साहाय्याने उस्त्रासन करताना दिसत आहे. तर त्यानंतर तिने अंजनेयासन केले आहे आणि सर्वात शेवट ती शीर्षासन करताना संबंधित व्हिडीओमध्ये दिसत आहे.
मलायकाच्या व्हिडीओवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव
मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "प्राऊड ऑफ यू मॅम," एका चाहत्याने कमेंट केली. दुसर्या एका चाहत्याने लिहिले, खूप प्रेरणादायी! "वाईट कमेंट्सना सकारात्मकतेने घ्या", असे एकाने लिहिले आहे. तर इतरांनी पोस्टखाली फायर इमोजी टाकल्या आहेत.
मलायकाने अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला फोटो
आज मलायकाने तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने अर्जुनचे अनेक फोटो कॅप्शनसह पोस्ट केले, “हॅपी बर्थडे, माय सनशाईन, माय थिंकर, माय गूफी, माय शॉपहोलिक, माय हँडसम.
मलायका आणि अर्जुनने 2019 मध्ये एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांचे रिलेशनशिप जाहीर केले होते. तिने यापूर्वी अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या