Rudrangi Trailer Out: जगपती बाबू आणि ममता मोहनदास यांच्या 'रुद्रांगी'चा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
'रुद्रांगी' (Rudrangi) चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय सम्राट यांनी केले आहे.
Rudrangi Trailer Out: अभिनेता जगपती बाबू (Jagapathi Babu) आणि ममता मोहनदास (Mamta Mohandas) यांचा आगामी तेलुगू चित्रपट 'रुद्रांगी'चा (Rudrangi) ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय सम्राट यांनी केले आहे. या अॅक्शनपॅक्ड ट्रेलरमध्ये गरिबांना कशी वाईट वागणूक दिली जाते आणि त्यांचे जगणे कसे कठीण होऊन बसते हे पाहायला मिळते. हा चित्रपट 7 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'रुद्रांगी' हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे, जो स्वातंत्र्यापूर्वी तेलंगणाची स्थिती प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. स्वातंत्र्यापूर्वी श्रीमंत लोक गरीबांना कसे त्रास द्यायचे, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. जगपती बाबूनं या चित्रपटात क्रूर जमीनदाराची भूमिका साकारली आहे. हा बिग बजेट चित्रपट 7 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
जगपती बाबू आणि ममता मोहनदास यांच्याशिवाय 'रुद्रांगी' या चित्रपटात आशिष गांधी, विमला रमण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि टीझरही रिलीज करण्यात आले होते, त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
View this post on Instagram
ममता मोहनदासने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 'रुद्रांगी' या चित्रपटाचा टीझर शेअर केला आणि चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजबद्दल माहिती दिली.संतोष मनामोनी 'रुद्रांगी' या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. या चित्रपटाचे एडिटर बोन्थला नागेश्वरा रेड्डी हे असून चित्रपटाचे संगीत नफल राजा एआयएसपी यांनी दिले आहे.
काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या जगपती बाबूच्या (Jagapathi Babu) चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटात जगपती बाबूसोबतच सलमान खान, पूजा हेगडे यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती. आता त्याच्या 'रुद्रांगी' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: