Malaika Arora Viral Post: एकीकडे अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप अन् कुमार संगकारासोबतच्या अफेअरच्या चर्चा; त्यात मलायका म्हणतेय, 'जहां इज्जत ना हो वहां दूरी सही...'
Malaika Arora Cryptic Post: Malaika Arora Viral Post: मलायका अरोरानं नुकतीच सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'जिथे आदर नाही, तिथे अंतर राखणंच योग्य आहे'

Malaika Arora Cryptic Post: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा तिच्या क्रिप्टीक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. खरंतर, अर्जुन कपूरसोबतच्या (Arjun Kapoor) ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचं नाव क्रिकेटपटू कुमार संगकारासोबत (Kumar Sangakkara) जोडलं जात आहे. पण, आता मलायकानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट काहीतरी वेगळंच सांगत आहे. मलायकाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री नेमकं काय म्हणालीय? सविस्तर पाहुयात...
मलायकाची पुन्हा क्रिप्टीक पोस्ट
मलायका अरोरानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अभिनेत्रीनं लिहिलंय की, "तुम्ही जितके मोठे व्हाल, तितके तुम्ही संघर्षापेक्षा शांतता आणि अनादर यांच्यात योग्य अंतर राखाल. नाटक तुमच्यासाठी असह्य होतं आणि तुमच्यासाठी शांती तुमची पहिली पसंती बनते. तुम्ही स्वतःला अशा लोकांभोवती वेढू लागता, जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी, हृदयासाठी आणि आत्म्यासाठी चांगले असतात."

"आत्मविश्वास वास्तव बदलू शकतो"
याआधी, अभिनेत्रीनं तिच्या एका पोस्टमध्ये असंही लिहिलं होतं की, "तुमच्या आत्मविश्वासात वास्तव बदलण्याची शक्ती आहे. अशा परिस्थितीत, काही लोक तुम्हाला अहंकारी म्हणतील, पण काही लोक तुम्हाला अनुभवी देखील म्हणतील. पण जे लोक असं मानतात की, तुमच्यासोबत सर्वात चांगल्या गोष्टी घडत आहेत ते अगदी बरोबर आहेत..."
मलायकाचं नाव एका क्रिकेटपटूशी जोडलं
काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा राजस्थान रॉयल्सचा जयजयकार करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली होती. जिथे अभिनेत्री क्रिकेटर कुमार संगकारासोबत बसलेली दिसली. त्या सामन्यातील दोघांचे व्हिडीओ खूप व्हायरल झाले. त्यानंतर लोक त्यांच्या नात्याबद्दल अंदाज लावू लागले. सर्वांना वाटू लागलं की, आता ही अभिनेत्री त्या क्रिकेटपटूला डेट करत आहे. कुमार संगकारा आणि मलायका दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. अशातच आता मलायकानं केलेल्या क्रिप्टीक पोस्टमुळे सारेच विचारात पडले आहेत की, मलायकाला नेमकं म्हणायचंय काय? दरम्यान, मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत पाच वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होती. गेल्या वर्षीच दोघांचं ब्रेकअप झालं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















