Mahavatar Narsimha : 'महावतार नरसिंह'चा फर्स्ट लूक समोर, KGF अन् 'कांतारा'च्या निर्मात्यांचा आगामी धमाकेदार चित्रपट
Mahavatar Narsimha : महावतार नरसिंह चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं असून त्यामध्ये फर्स्ट लूक समोर आला आहे.

Mahavatar Narsimha Motion Poster : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आगामी दमदार प्रोजेक्ट समोर येत आहेत. आता केजीएफ आणि कांतारा चित्रपटांच्या निर्मात्यांच्या आगामी दमदार चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 'महावतार नरसिम्हा' चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'महावतार नरसिम्हा' चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. होम्बले फिल्म्सने त्यांच्या आगामी 'महावतार नरसिम्हा' चित्रपटाची घोषणा करत पहिली झलक शेअर केली आहे. हे पोस्टर पाहून हा चित्रपट किती दमदार असेल, याची अपेक्षा चाहत्यांकडून करण्यात येत आहे.
'महावतार नरसिंह' चा फर्स्ट लूक समोर
होम्बले फिल्म्सने त्यांच्या आगामी 'महावतार' फ्रेंचायझीच्या सीरिजमधील पहिल्या चित्रपटाचं फर्स्ट लूक समोर आणला आहे. 'महावतार' फ्रेंचायझीमधील पहिला भाग 'महावतार नरसिम्हा' चित्रपटाच्या फर्स्ट लूकवरुन पडदा हटवण्यात आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर येताच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 'महावतार नरसिम्हा' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहेत.
View this post on Instagram
केजीएफ अन् 'कांतारा'च्या निर्मात्यांचा आगामी धमाकेदार चित्रपट
होम्बले फिल्म्सने मोठी घोषणा केली आहे. शनिवारी होंबळे फिल्म्सने आपल्या 'महावतार' फ्रँचायझीचा पहिला भाग 'महावतार नरसिंह'चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता. होम्बले फिल्म्सने केजीएफ (KGF) आणि कांतारा (Kantara) सारखे दमदार चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या नव्या चित्रपटाच्या घोषणेमुळे चाहत्यांचा उत्साह वाढला असून त्यांची अपेक्षाही वाढली आहे.
महावतार नरसिंहचं मोशन पोस्टर
महावतार नरसिंह या पौराणिक चित्रपटाचं हाय-ऑक्टेन मोशन पोस्टर शेअर करताना, होम्बले फिल्म्सने लिहिलं आहे की, 'जेव्हा विश्वासांना आव्हान दिलं जातं, तेव्हा तो उदयास येतात. अंधार आणि गोंधळ माजलेल्या जगात, दंतकथा, अर्ध-मनुष्य, अर्ध-सिंह अवतार - भगवान विष्णूचा सर्वात शक्तिशाली अवतार पाहा.'
View this post on Instagram
थ्रीडीमध्ये असेल 'हा' चित्रपट
निर्मात्यांनी पुढे लिहिलं आहे, '3D मध्ये चांगल्या आणि वाईट यांच्यातील महाकाव्य युद्धाचा अनुभव घ्या. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात लवकरच येत आहे. 'महावतार नरसिंह' हा महावतार फ्रेंचायझीचा पहिला भाग आहे. हा चित्रपट 3D मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटात हिंदू पौराणिक कथांमधील पौराणिक कथा पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























