Lock Upp Show : लॉकअपमध्ये जाण्यापूर्वी कंगना-पायल रोहतगीमध्ये वाद, आलिया भट्ट ठरली कारण!
Kangana Ranaut : कंगनाच्या शोमध्ये अभिनेत्री पायल रोहतगीनेही (Payal Rohtagi) शोमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, यावेळीच कंगना आणि तिच्यात जोरदार वादावादीही झाली.
Lock Upp Show : रविवारी कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'लॉक अप' (Lock Upp) शोचा ग्रँड प्रीमियर पार पडला. ‘लॉक अप’ शो सुरू होण्यापूर्वी निर्मात्यांनी काही सेलिब्रिटींची नावे जाहीर केली होती आणि शोच्या प्रीमियरमध्ये काही नवीन आणि प्रसिद्ध स्टार्सची नावे देखील समोर आली होती. या शोमध्ये सहभागी झालेल्या सेलेब्सना 72 दिवस तुरुंगवास भोगावा लागणार आहे. अभिनेत्री पायल रोहतगीनेही (Payal Rohtagi) शोमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, यावेळीच कंगना आणि तिच्यात जोरदार वादावादीही झाली.
पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने पायलला मध्यातच थांबवल्याने पायल भडकली. खरे तर पायलवर आरोप झाले, तेव्हा तिने स्वतःच्या बचावात कंगनाचे उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. यावर कंगनाने तिला थांबवले आणि म्हणाली की, ‘तू तुझे काम कर… माझे उदाहरण देऊ नकोस.’ यावर पायलने तिला सांगितले की, तू नेहमी विनाकारण आलिया आणि तिचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ला मधे आणतेस.
मात्र, यावेळी कंगनाने संयम राखला आणि हे प्रकरण तिथेच सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पायल नेहमीच म्हणत असते की, ALTBalaji वर प्रौढ सामग्री प्रसारित केली जाते, म्हणून जेव्हा तिला विचारले गेले की, ती ALTBalaji च्या या शोचा भाग का झाली, तेव्हा पायल भडकली.
‘लॉक अप’ शोमध्ये सर्व स्पर्धकांवर 24x7 लक्ष ठेवले जाईल. ते पाहण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सबस्क्रिप्शनची गरज नाही. हा शो प्रेक्षक पूर्णपणे मोफत पाहू शकतात. तथापि, तुमच्याकडे Alt Balaji आणि MX Player अॅप असणे आवश्यक आहे. रवीना टंडन देखील लॉक अप टीव्ही शोचा एक भाग असणार आहे. एका दिवसासाठी रवीना या शोमध्ये जेलरची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा :
- Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग
- House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड
- Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha