Laapataa Ladies Copied From Burqa City: 'लापता लेडीज' 'बुर्का सिटी'ची कॉपी? परदेशी फिल्मचा व्हिडीओ पाहून सारेच हैराण; नेटकऱ्यांनी आमिर खानच्या घटस्फोटीत बायकोला झाड झाड झाडलं
Laapataa Ladies Copied From Burqa City: 'लापता लेडीज' आणि 'बुर्का सिटी' दोन्ही चित्रपटांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओ पाहून युजर्स हे अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हणत आहेत.

Laapataa Ladies Copied From Burqa City: किरण राव (Kiran Rao) आणि आमिर खान (Aamir Khan) यांच्या 'लापता लेडीज' चित्रपटाचं जगभरात कौतुक झालं. चित्रपटाच्या जवळपास सर्वच कलाकारांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. एवढंच काय तर, भारताच्या वतीनं 97व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी देखील 'लापता लेडीज'ला नॉमिनेशन मिळालं. पण, ज्या चित्रपटाचा इतका गाजावाजा झाला आणि ज्याच्या चर्चा संपूर्ण जगभरात रंगल्या, तोच 'लापता लेडीज' प्रत्यक्षात मात्र, एका परदेशी चित्रपटाची कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे. 'बुर्का सिटी' नावाच्या परदेशी चित्रपटाला कॉपी करून 'लापता लेडीज' बनवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 'लापता लेडीज' आणि 'बुर्का सिटी' दोन्ही चित्रपटांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओ पाहून युजर्स हे अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हणत आहेत.
'लापता लेडीज'ची पटकथा आणि कथानक 'बुर्का सिटी' वरून कॉपी करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काही पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. तेव्हापासून 'लापता लेडीज'बद्दल वाद सुरू झाला आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लापता लेडीज'ला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं नसलं तरी, भारतात 'लापता लेडीज'नं अनेक पुरस्कार जिंकले आहेत. पण 'रेडिट' वर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे.
![]()
'बुर्का सिटी'चा व्हिडीओ रेडिटवर व्हायरल
अलिकडेच, 'रेडिट'वर काही पोस्टमध्ये Fabrice Bracq च्या 'बुर्का सिटी' या 19 मिनिटांच्या शॉर्ट फिल्मचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मिडल ईस्टमधील या चित्रपटात एका नवविवाहित पुरूषाची कथा आहे, ज्याची वधू तिच्या बुरख्यामुळे बदलली जाते. भलतीच कोणतीतरी स्त्री त्याच्यासोबत येते. मग तो त्याची वधू शोधण्यासाठी निघतो. अनेक नेटकऱ्यांना 'बुर्खा सिटी'ची कथा आणि कथानक किरण रावच्या 'लापता लेडीज' सारखंच वाटलं. फरक एवढाच आहे की, 'लापता लेडीज' मध्ये बुरख्याला घूंघटनं रिप्लेस केलं आहे.
View this post on Instagram
'घूंघट के पट खोल'शी देखील मिळती-जुळती 'लापता लेडीज'ची कहाणी
'बुर्का सिटी' ची व्हिडीओ क्लिप शेअर करुन युजर्सनी यावर रिअॅक्ट केलं आहे. पण, नेटकऱ्यांनी 'लापता लेडीज' आणखी एक व्हिडीओ क्लिप शोधून काढली आहे, ज्याचा प्लॉट 'लापता लेडीज'शी मिळता जुळता आहे. हे वर्ष 1999 मध्ये आलेला चित्रपट 'घूंघट के पट खोल' आहे, जो अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केला होता.
'घूंघट के पट खोल'च्या दिग्दर्शकांनी केलेली पोस्ट
अनंत महादेवन यांनी याबाबत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 2024 मध्ये एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची (लापता लेडीज) कथा त्यांच्या चित्रपटाशी कशी मिळतेजुळते आहे.
लाजिरवाणं आहे हे, युजर्स संतापले
'लापता लेडीज' हा मूळ चित्रपट नसून दोन चित्रपटांची कॉपी आहे, हे पाहून युजर्स संतापले आहेत. हे सर्व लाजिरवाणं असल्याचं युजर्सनी म्हटलं आहे. एका युजरनं लिहिलंय की, "आणि त्यांनी तो ऑस्करला पाठवला.", दुसऱ्या एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय की, "निर्माते याला यश कसं मानू शकतात? याला इंस्पायर्ड फिल्म म्हणता येईल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























