Laal Singh Chaddha Song Kahani : आमिर खानच्या लाल सिंह चड्ढामधील पहिलं गाणं रिलीज; 'कहानी'नं जिंकली प्रेक्षकांची मनं
लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटामधील पहिलं गाणं नुकतच रिलीज झालं आहे.
Laal Singh Chaddha Song Kahani : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) च्या लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. आमिरसोबतच या चित्रपटामध्ये करिना कपूर (Kareena Kapoor), नागा चैतन्य (Naga Chaitanya), मोना सिंह (Mona Singh), मानव विज (Manav Vij) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटामधील पहिलं गाणं नुकतच रिलीज झालं आहे. कहानी असं या गाण्याचं नाव आहे. रिलीज झाल्यावर काही वेळेतच नेटकऱ्यांकडून या गाण्याला पसंती मिळाली आहे.
कहानी हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. तसेच मोहन कन्नननं हे गाणं गायलं आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटामधील गाण्यांना प्रितम यानं संगीत दिलं आहे. चित्रपटांमधील गाण्यांबाबत आमिरनं सांगितलं, 'लाल सिंग चड्ढा चित्रपटामधील गाणी ही या चित्रपटाचा आत्मा आहेत आणि या चित्रपटामधील अल्बममध्ये माझ्या करिअरमधील सर्वोत्तम गाणी आहेत. या गाण्यांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. ' टी सीरिजनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणं शेअर केलं आहे. यावर कमेंट करून अनेक नेटकऱ्यांनी गाण्याला पसंती दर्शवली आहे.
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Cannes Film Festival: 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाचं नाव; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
- Gulhar : 'मनात आलं तर प्रेम करीन, नाहीतर एखाद्याचा गेम करीन;' 'गुल्हर' चित्रपटाचा जबदस्त ट्रेलर रिलीज
- Alia Bhatt : लग्नानंतर आलियाला मिळाली 'गुड न्यूज'; चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावरही डंका
- Laal Singh Chaddha : आमिर, करिना अन् नागा चैतन्य; 'लाल सिंह चड्ढा' मध्ये काम करण्यासाठी कलाकारांनी घेतले एवढे मानधन