केआरकेविरोधात सलमान खाननं दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा; भाईजानच्या चित्रपटांचं समीक्षण करणार नाही केआरकेची प्रतिज्ञा
अभिनेता सलमान खान याचा राधे हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटाला चाहत्यांची फारशी पसंती मिळाली नाही

मुंबई : अभिनेता सलमान खान याचा 'राधे' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटाला चाहत्यांची फारशी पसंती मिळाली नाही, समीक्षकांनीही चित्रपटाला बेताचेच रिव्ह्यू दिले. त्यातच आता एक स्वघोषित समीक्षक अडणीत सापडण्याची चिन्हं आहेत. कारण, खुद्द सलमान खान यानंच या समीक्षकाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.
सलमान खानची कायदेशीर कामं पाहणाऱ्या टीमने कमाल खान याला सोमवारी रितसर नोटीस पाठवली. कमाल खान याने ट्विट करत सदर घटनाक्रमाची माहिती दिली. 'सलमान खाननं राधे या चित्रपटाचं समीक्षण केल्याबद्दल माझ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे', असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. नोटीसमध्ये लिहिल्यानुसार सलमानची लीगल टीम गुरुवारी सदर प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी आवाहन करणार आहेत, असंही त्यानं सांगितलं.
आपल्याला आलेल्या नोटिसबद्दल सांगितल्यानंतर यापुढं कधीही सलमानच्या चित्रपटाचं समीक्षण करणार नसल्याचं सलमानने स्पष्ट केलं आहे. मी काही तुझी कारकिर्द बरबाद करत नाहीये, असं त्याने सलमानला उद्देशून म्हटलं. आपण फक्त मनोरंजनासाठीच चित्रपटांचं समीक्षण करत असून, जर आपल्यामुळे सलमान खानच्या चित्रपट कारकिर्दीला धोका पोहोचणार असेल तर आपण त्याच्या चित्रपटांचं समीक्षण करणार नाही, त्यानं मला आपल्या चित्रपटाचं समीक्षण न करण्याविषयी सांगितलं असतं तर मी ते केलंही नसतं असंही केआरकेनं स्पष्ट केलं आहे.
Dear #Salmankhan Ye defamation case Aapki Hataasha Aur Niraasha Ka Saboot Hai. I am giving review for my followers and doing my job. You should make better films instead of stopping me from reviewing your films. Main Sacchi Ke Liye Ladta Rahunga! Thank you for the case. 🙏🌹 pic.twitter.com/iwYis64rLd
— KRK (@kamaalrkhan) May 25, 2021
Respected @luvsalimkhan Sahab, I am not here to destroy @BeingSalmanKhan films or his career. I review films just for fun. If I know that Salman get affected by my review so I won’t review. If he could have asked me to not review his film So I would have not reviewed.
— KRK (@kamaalrkhan) May 26, 2021
केआरके कायमच त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळं चर्चेत असतो. त्याचा हा अंदाज आणि कलाकारांविषयी, कलाविश्वाविषयीची वक्तव्य त्याला सतत वादाच्या भोवऱ्यात अडकवतात.


















