KK Death : केके यांच्या मृत्यूनंतर कॉलेज प्रशासनाला मोठा धक्का; घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय
केके यांच्या मृत्यूनंतर कॉन्सर्टमध्ये केलेल्या खराब व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
KK Death : कोलकाता येथील नजरुल मंच येथे गायक केके (KK) यांचे कॉन्सर्ट पार पडले. पण आता कॉलेज फेस्टवर बंदी घातली जाऊ शकते. कोलकाता येथील गुरुदास कॉलेजने मंगळवारी सायंकाळी आयोजित केलेल्या फेस्टमधील खराब क्राउड मॅनेजमेंटनंतर आता या संदर्भात विचार केला जात आहे.
केके यांच्या मृत्यूनंतर कॉन्सर्टमध्ये केलेल्या खराब व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोलकाता मेट्रोपॉलिटन डेवलपमेंट अथॉरिटीच्या (KMDA) महासंचालक सुप्रियो मैती यांच्या नेतृत्वाखालील KMDA च्या टीमनं बुधवारी दुपारी नजरुल मंचच्या पायाभूत सुविधां पाहणी केली. आता ही टीम तिथे कॉलेज फेस्टवर बंदी घालण्याचा विचार करत आहेत.
रिपोर्टनुसार, नझरूल स्टेजची क्षमता 2,700 ते 3,000 पर्यंत मर्यादित आहे, परंतु कॉन्सर्टच्या वेळी, 6,000 लोकांचा जमाव तिथे होता, तिथे बरेच लोक पायऱ्यांवर बसले होते. तर काही लोक हे उभे राहून कॉन्सर्ट पाहात होते. केएमडीएच्या टीमचे असे मतं आहे की गर्दीच्या जागेमुळे एयर कंडीशनिंग मशिन्सचा प्रभाव कमी झाला आणि त्यामुळे गुदमरल्यासारखे झाले. कोलकाताचे महापौर आणि राज्याचे परिवहन मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितलं की, केके यांच्या लोकप्रियतेमुळे मैफल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण येत होते.
हकीम हे केएमडीएचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी सांगितलं, ही जागा यापुढे कॉलेज फेस्टसाठी देऊ नये, अशी विनंती केएमडीएच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र, या विषयावर आम्ही अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. '
केके यांची गाणी
'माचीस' चित्रपटातील गाण्यांमधून गायक केके यांना विशेष लोकप्रियता मिळाली. माचीस चित्रपटामधील छोड आये हम... या चित्रपटातील गाण्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल चुके सनम' या चित्रपटामधील तड़प तड़प के... या केके यांच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
इतर संबंधित बातम्या
- Krishnakumar Kunnath Died : गायक केके यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा, पंतप्रधान मोदींसह मान्यवरांकडून श्रद्धांजली
- Krishnakumar Kunnath Died: केकेने गायलेली 'ही' गाणी कधीच विसरता येणार नाही
- Krishnakumar Kunnath Died : गायक केके यांचे निधन, कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका