Kiran Mane : सध्याच्या काळात 'या' सारखं सुख नाही; अभिनेता किरण मानेंची पोस्ट चर्चेत
Kiran Mane : अमळनेर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात किरण माने हे एका परिसंवादात सहभागी झाले होते. या विद्रोही साहित्य संमेलनात आलेल्या संमेलनात आलेल्या अनुभवावर किरण माने यांनी पोस्ट लिहिली.
Actor Kiran Mane Social Media Post : मराठी अभिनेता किरण मानेंची (Kiran Mane) सोशल मीडियावरील पोस्ट चांगल्याच चर्चेत असतात. राजकारणात प्रवेश केल्यानंतर किरण माने यांच्या पोस्टची अधिकच चर्चा होऊ लागली आहे. अमळनेर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात (Vidrohi Sahitya Sammelan) किरण माने हे एका परिसंवादात सहभागी झाले होते. या विद्रोही साहित्य संमेलनात आलेल्या संमेलनात आलेल्या अनुभवावर किरण माने यांनी पोस्ट लिहिली. द्वेष पसरवणार्या भवतालात लोकांना प्रेमाचा संदेश भावतो यासारखं सुख नसल्याचे किरण माने यांनी म्हटले.
किरण माने यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले की, प्रत्येक कलाकाराची इच्छा असते आपण लोकप्रिय व्हावं. लोकांचा 'आवडता' व्हावं. मला या गोष्टी या दोन वर्षांत भरभरून मिळाल्या. माझ्यावर जीव लावणारे, मनापासून प्रेम करणारे लाख्खो लोक महाराष्ट्रभरात आहेत. रोज महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या गांवातनं वेगवेगळ्या समारंभासाठी निमंत्रण घेऊन मला किमान पंचवीस फोन्स येतात. प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत मी. पण जिथे जाईन तिथे हजारोंच्या संख्येनं लोक आलेले असतात. प्रत्येकाला मला आपुलकीनं पर्सनली भेटायचं असतं. हे सगळं पाहून मन भरून येतं. कुणी कितीही बदनाम करायचा प्रयत्न करूदेत, चांगुलपणाचा आणि प्रामाणिकपणाचा विजय होतो यावरचा विश्वास दृढ होतो !
भाषण सुरू असताना चिठ्ठी आली...
किरण माने हे विद्रोही साहित्य संमेलनात भाषण करत असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्याबाबत त्यांनी म्हटले की, काल माझं भाषण सुरू करताना माझ्या पोडीयमवर एक चिठ्ठी आली. त्यावर लिहीलंवतं, 'आत्ता अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुख्यमंत्री येणार होते. तिथे अक्षरश: मंडप रिकामा होता. मुख्यमंत्र्यांनी दौरा कॅन्सल केला.
फुले-शाहू-आंबेडकर हे नाव दमात का घ्यायचं?
सगळ्यात लक्षात रहाण्यासारखा क्षण म्हणजे, जेव्हा मी फुलेशाहूआंबेडकर हे एका दमात म्हणालो.. आणि म्हणालो, "हे मी एका श्वासात का म्हणालो? कारण ही त्रयी तोडायची नाही आपल्याला. आज मराठा ओबीसी दलित अशी फूट पाडली जातेय. ते कारस्थान यशस्वी नाही होऊ द्यायचं." तेव्हा जो उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट झाला, तो अद्भूत आनंद देणारा होता. प्रेक्षकांत सर्व जातींचे बहुजन बसले होते. द्वेष पसरवणार्या भवतालात लोकांना प्रेमाचा संदेश भावतो यासारखं सुख नाही असे किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.