kgf chapter 2 : केजीएफ- 2 ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई
रिलीज झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
![kgf chapter 2 : केजीएफ- 2 ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई KGF Chapter 2 Box Office Collection Day 1 Yash Sanjay Dutt kgf chapter 2 : केजीएफ- 2 ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/7c9b334dde1917f98ede4a90998e3d46_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KGF Chapter 2 Box Office Collection : दाक्षिणात्या स्टार यशचा (Yash) 'केजीएफ चॅप्टर 2' (KGF Chapter 2) हा चित्रपट काल (15 एप्रिल) रिलीज झाला. या चित्रपटामध्ये यशसोबतच संजय दत्त (Sanjay Dutt), मालविका अविनाश (Malavika Avinash),श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty)आणि रवीना टंडन (Raveena Tandon) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पाहूयात केजीएफ-2 चित्रपटाची ओपनिंग-डे ची कमाई....
तरण आदर्श यांनी ट्वीट करून केजीएफ-2 या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती नेटकऱ्यांना दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'केजीएफनं पहिल्याच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं 53.95 कोटींची कमाई करून वॉर, ठग्स ऑफ हिंदुस्थान या चित्रपटांचे ओपनिंग डे कलेक्शनचं रेकॉर्ड तोडलं आहे. '
वॉर या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 51.60 कोटींची कमाई केली तर ठग्स ऑफ हिंदुस्थाननं 50.75 कोटींची कमाई केली होती, अशी माहिती तरण आदर्श यांनी या ट्वीटमधून दिली.
‘KGF2’ CREATES HISTORY, BIGGEST DAY 1 TOTAL… #KGF2 has demolished *opening day* records of #War and #ThugsOfHindostan… #KGFChapter2 is now BIGGEST OPENER in #India [#Hindi version]… *Day 1* biz…
— taran adarsh (@taran_adarsh) April 15, 2022
⭐️ #KGF2: ₹ 53.95 cr
⭐️ #War: ₹ 51.60 cr
⭐️ #TOH: ₹ 50.75 cr
Nett. #India biz. pic.twitter.com/XES04m8HTe
KGF Chapter 2 चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. 2018 मध्ये आलेल्या या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात 250 कोटींची कमाई केली.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)