KGF Chapter 2 Box Office Collection : रॉकिंग स्टार यशचा 'केजीएफ-2' करतोय रेकॉर्ड ब्रेक कमाई, पाहा बॉक्स ऑफिस कलेक्शन
केजीएफ-2 (KGF Chapter 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
KGF Chapter 2 Box Office Collection : 'रॉकिंग स्टार' अशी ओळख असणाऱ्या अभिनेता यशच्या (Yash) केजीएफ-2 (KGF Chapter 2) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. चित्रपट रिलीज होऊन पाच आठवडे झाले. तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता जगभरामध्ये या चित्रपटानं 1200 कोटींची कमाई करुन अनेक चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचं रेकॉर्ड तोडलं आहे.
ट्रेड अॅनालिस्ट मनोबल विजयबाला यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये केजीएफ चॅप्टर 2 च्या पहिल्या आठवड्यापासून ते पाचव्या आठवड्यापर्यंतची कमाई दिसत आहे. केजीएफ चॅप्टर 2 चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन हे 1200.76 कोटी आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 427.05 कोटी एवढी कमाई केली आहे. 14 एप्रिल 2022 रोजी केजीएफ चॅप्टर 2 रिलीज झाला होता. भारतामध्ये या चित्रपटानं रिलीज होण्याआधीच 134 कोटींची कमाई केली.
लवकरच रिलीज होणार केजीएफ-3
गेल्या आठवड्यामध्ये निर्माते विजय किरगंदूर यांनी माहिती दिली की, केजीएफ चॅप्टर 3 हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होणार असून हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होईल. ते म्हणाले, 'दिग्दर्शक प्रशांत नील सध्या सालारच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ३० ते ३५ टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याचे पुढील वेळापत्रक पुढील आठवड्यात सुरू होईल.'
#KGFChapter2 WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) May 16, 2022
ENTERS ₹1200 cr club.
Week 1 - ₹ 720.31 cr
Week 2 - ₹ 223.51 cr
Week 3 - ₹ 140.55 cr
Week 4 - ₹ 91.26 cr
Week 5
Day 1 - ₹ 5.20 cr
Day 2 - ₹ 4.34 cr
Day 3 - ₹ 6.07 cr
Day 4 - ₹ 9.52 cr
Total - ₹ 1200.76 cr
दिग्दर्शक प्रशांत नील यांनी केजीएफ चॅप्टर-2 या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यशशिवाय यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांनी काम केले आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. केजीएफ चॅप्टर-2 हा 2018 च्या केजीएफचा सिक्वेल आहे.
अॅमेझॉन प्राइमवर होणार प्रदर्शित
यशचा 'केजीएफ 2' हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाच भाषेत पाहायला मिळणार आहे. 'केजीएफ 2' हा सिनेमा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.
हेही वाचा :
- Chhupe Rustam : रंगभूमीवर नव्या नाटकाची नांदी, ‘छुपे रुस्तम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी!
- Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!
- Dhak Dhak Poster : कुणी बुरखा तर, कुणी परिधान केलाय पंजाबी ड्रेस! बाईकवर स्वार होऊन लडाख राईडला निघाल्या बॉलिवूडच्या स्टार्स!