पैठणच्या शेतकऱ्यानं 'कौन बनेगा करोडपती'मध्ये जिंकले 50 लाख, 1 कोटींच्या प्रश्नावर सोडला खेळ; तुम्हाला माहितीय 'त्या' प्रश्नाचं उत्तर?
KBCच्या हॉट सीटवर बसणं म्हणजे खरंतर आपल्या ज्ञानाची आणि वेळेत उत्तर देण्याच्या क्षमतेची कसोटीच असते. कैलाश रामभाऊंनी 10 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आणि विशेष म्हणजे एकाही लाईफलाईनचा वापर केला नाही.

Kon Banega Karodpati 17 : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचा "कौन बनेगा करोडपती" हा एक लोकप्रिय टीव्ही शो आहे. या शोचा 17 वा सीझन सध्या प्रीमियर होत आहे. या क्विझ गेम शोमध्ये सहभागींनी त्यांच्या हुशारीने लाखो रुपये जिंकले आहेत . मंगळवारच्या भागात पैठणच्या कैलाश रामभाऊ कुंटेवाड हॉट सीटवर होते. त्यांनी 14 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन 50 लाख रुपये जिंकले आहेत . (Nanded Farmer on KBC Hot seat)
KBC 17: मुलांना क्रिकेटर करण्यासाठी हॉट सीटवर, बीग बी इंप्रेस
कौन बनेगा करोडपती शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीला या स्पर्धकाचा परिचय दिला . कैलाश रामभाऊ हे व्यवसायाने शेतकरी असले तरी त्यांना क्रिकेटमध्ये खूप रस आहे. ते महिन्याला तीन हजार रुपये कमवतात आणि त्यांना दोन मुले आहेत . कैलास यांना आपल्या मुलांना क्रिकेटपटू म्हणून वाढवायचे आहे . त्यांना क्रिकेटमध्ये मदत करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे साधन नाही. त्यांना जिंकलेल्या पैशातून ते आपल्या मुलांना क्रिकेट अकादमीत पाठवण्याची इच्छा आहे . बिग बी अमिताभ बच्चन कैलाश रामभाऊंवर खूप प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितलं .
लाईफलाईनशिवाय दिली 10 प्रश्नांची अचूक उत्तरे
कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसणं म्हणजे खरंतर आपल्या ज्ञानाची आणि वेळेत उत्तर देण्याच्या क्षमतेची कसोटीच असते. कैलाश रामभाऊंनी 10 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली आणि विशेष म्हणजे त्यांनी एकाही लाईफलाईनचा वापर केला नाही. मंगळवारचा एपिसोड 11 व्या प्रश्नाने सुरू झाला . ज्याचे बक्षीस 7.50 लाख रुपये आहे. या प्रश्नाचेही उत्तर कैलाश रामभाऊंनी बरोबर अचूक दिले. 12 व्या प्रश्नासाठी कैलाश यांनी ऑडियन्स पोल लाईफलाईनचा वापर केला आणि जनतेवर विश्वास ठेवून, योग्य उत्तर दिले.
जोखीम पत्करून दिले 13 व्या प्रश्नाचे उत्तर
कैलाश रामभाऊ 13 व्या प्रश्नाबद्दल थोडे गोंधळलेले होते, पण त्यांनी जोखीम घेतली आणि चार पर्यायांपैकी एक निवडला, जो बरोबर निघाला. बरोबर उत्तर लक्षात आल्यानंतर, ते आनंदाने उड्या मारत होते .. मग 14 वा प्रश्न येतो, ज्याचे उत्तर कैलास यांनी दिलं आणि 50 लाख रुपये जिंकले .
1 कोटीचा प्रश्न आला , 50- 50 लाईफलाईनही घेतली पण ..
अमिताभ बच्चन 15 वा प्रश्न वाचतात ज्याची किंमत एक कोटी रुपये आहे. कैलाश रामभाऊ लाफलाइन हिंट वापरतात. हिंट मिळाल्यानंतरही उत्तराबद्दल अनिश्चित असल्याने आणि 50 - 50 लाईफलाइन त्यांनी वापरली. तरीही, योग्य उत्तर मिळलं नाही. शेवटी कैलास यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला आणि 50 लाख रुपयांसह 'KBC 17' मधून Exit घेतली .
प्रश्न काय होता आणि बरोबर उत्तर काय होते?
15 वा प्रश्न कोणता होता? राष्ट्रपती भवनात असलेल्या विवियन फोर्ब्स यांनी लिहिलेल्या "इन्व्हेन्शन ऑफ द प्रिंटिंग प्रेस" या चित्रात कोणाचे चित्रण आहे?
पर्याय: ए. जोहान फस्ट, बी. विल्यम कॅक्सटन, सी. जोहान्स, डी. रिचर्ड एम. हो
बरोबर उत्तर: बी. विल्यम कॅक्सटन
हेही वाचा























