एक्स्प्लोर

Sakaal Tar Hou Dya Official Trailer OUT: गूढ रहस्य अन् तितकाच थ्रीलर; सुबोध भावे, मानसी नाईकच्या 'सकाळ तर होऊ द्या'चा ट्रेलर रिलीज

Sakaal Tar Hou Dya Official Trailer OUT: निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनी अंतर्गत 'सकाळ तर होऊ द्या' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून समिट स्टुडिओज आणि मधु शर्मा हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

Sakaal Tar Hou Dya Official Trailer OUT: सुबोध भावे (Subodh Bhave) आणि मानसी नाईक (Mansi Naik) ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा 'सकाळ तर होऊ द्या' हा चित्रपट फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. टीझरमध्ये झलक पाहिल्यानंतर या चित्रपटाची चर्चा अधिकाधिक रंगू लागली आहे. आता 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनी अंतर्गत 'सकाळ तर होऊ द्या' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून समिट स्टुडिओज आणि मधु शर्मा हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. आजवर हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या दिग्दर्शक आलोक जैन यांनी या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री केली आहे. 

या चित्रपटातील सुबोध भावे आणि मानसी नाईक या दोन कलावंतांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खुणावणार असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. आपल्या मनातील प्रश्नांची उकल करण्यासाठी संपूर्ण समाजापासून अलिप्त राहणाऱ्या नायकाची कथा या चित्रपटात असल्याचे ट्रेलरच्या सुरुवातीच्या संवादांवरून समजते. अशातच नायकाच्या आयुष्यात नियती नावाच्या नायिकेची एन्ट्री होते. इथूनच विचार आणि भाव-भावनांचा एक अनोखा प्रवास सुरू होतो. नायकाने त्याच्या मनात साठवून ठेवलेले जाणण्याचा प्रयत्न नायिका करते. नायक तिला एक काम करायला सांगतो जे ऐकून तिला धक्का बसतो. तो असे का सांगतो? याचे कोडे 'सकाळ तर होऊ द्या' हा चित्रपट पाहिल्यावर उलगडणार आहे. 'नाच मोरा...', आणि 'जगू दे मला...' या श्रवणीय गाण्यांचा समावेश करण्यात आल्याने ट्रेलर अधिकच लक्षवेधी बनला आहे. आजवर कधीही न दिसलेल्या लुकमधील सुबोधची व्यक्तिरेखा उत्सुकता वाढवणारी आहे. मानसीने साकारलेली नियती कुतूहल वाढविणारी आहे. 

'सकाळ तर होऊ द्या' चित्रपटाचे संवादलेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी केले असून छायांकन सुनील पटेल यांनी केले आहे. गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलेल्या गीतांना गायक-संगीतकार रोहित राऊत यांनी संगीत दिले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरक आहेत.

पाहा ट्रेलर : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका
Mohit Kamboj Coffee With Kaushik : तेजस ठाकरेंचे 'ते' व्हिडीओ, मलिकांशी वैर ते सिद्दिकी प्रकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget