Karan Johar Secrets: करण जोहर गे? सेक्सुअलिटी, वर्जिनिटी अन् सुपरस्टारसोबतच्या अफेअरवर धक्कादायक खुलासा
Karan Johar Secrets: करण जोहरनं आपली बायोग्राफी 'एन अनसूटेबल बॉय'मध्ये समलैंगिक असण्याबद्दल विचारल्यावर खळबळजनक खुलासे केले आहेत.

Karan Johar Secrets: फिल्ममेकर करण जोहरवर (Karan Johar) नेटकऱ्यांच्या नजरा खिळलेल्याच असतात. करणसंदर्भातली एखादी गोष्ट समोर आली की, ती व्हायरल झालीच म्हणून समजा. नेटकऱ्यांच्या निशाण्यावर करण अनेकदा असतोच. करण जोहरवर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. विशेषतः तो गे तर नाही? हा प्रश्न हमखास चर्चेत असतो. बॉलिवूडच्या (Bollywood) सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक असलेला करण जोहर, मात्र नेहमीच टीकेचा धनी होत असतो. करण जोहरनं इन्सायडर्सपासून आऊटसायडर्सपर्यंत अनेकांना इंडस्ट्रीत संधी दिली. अशातच आता स्वतः करण जोहरनं आपल्या सेक्सुअॅलिटीबाबत मोकळेपणानं संवाद साधला आहे. तसेच, त्याच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेवरही त्यानं परखड मत व्यक्त केलंय.
सेक्सुअॅलिटीबाबत काय म्हणाला करण जोहर?
करण जोहरनं आपली बायोग्राफी 'एन अनसूटेबल बॉय'मध्ये समलैंगिक असण्याबद्दल विचारलं असता, करण म्हणाला होता की, "माझी लैंगिकता काय आहे? हे सर्वांना माहीत आहे. मला ओरडून ओरडून काही सांगण्याची गरज नाही. मला हे स्पष्ट करण्याची गरज नाही. मी ज्या देशात राहतो, तिथे हे बोलल्याबद्दल मी तुरुंगात जाऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही. मी करण जोहर, ते तीन शब्द अजिबात बोलणार नाही, ज्याबाबत कदाचित प्रत्येकाला माहीत आहे."
View this post on Instagram
करण जोहरनं त्याचे कौमार्य कधी गमावलं?
करण जोहरनं आपल्या व्हर्जिनिटीबाबतही उघडपणे भाष्य केलं. करणनं सांगितलेलं की, त्यानं 26 वर्षांचा असताना त्याची व्हर्जिनिटी गमावली. करण जोहरनं सांगितलेलं की, तो न्यू यॉर्कला अतिशय सुरक्षित Escort Services साठी गेला होता. पण, ते सर्व त्याला आवडलं नसल्याचंही तो म्हणाला.
याशिवाय, करण जोहरनं त्याचा मित्र शाहरुख खानसोबतच्या अफवांबद्दलही वक्तव्य केलं. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या अफवांमुळे करण दुखावला गेला. तो शाहरुखला आपला मोठा भाऊ मानतो. करण म्हणाला होता, 'लोक बकवास बोलतात आणि जर एखाद्याचे एक्स्ट्रामॅरिटल अफेयर नसतील तर त्याला समलैंगिक मानलं जातं.
दरम्यान, करण जोहरचा वाढदिवस रविवारी होता. सर्वांनीच करणवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. फराह खाननं करण जोहरच्या बर्थडे सेलिब्रेशनची झलक चाहत्यांना दाखवली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























