Karan Johar Bollywood : 'तृतीयपंथीय कलाकारांनाही बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी', करण जोहरकडे कोणी केली मागणी?
Karan Johar Bollywood : तृतीयपंथीय अभिनेत्री शुभी शर्मा (Shubhi Sharma) नुकतीच तिच्या 'चांद जलने लगा' मधून प्रेक्षकाच्या भेटीला आली होती. या सिनेमात विशाल, आदित्य सिंह आणि कनिका मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे.
Karan Johar Bollywood : तृतीयपंथीय अभिनेत्री शुभी शर्मा (Shubhi Sharma) नुकतीच तिच्या 'चांद जलने लगा' मधून प्रेक्षकाच्या भेटीला आली होती. या सिनेमात विशाल, आदित्य सिंह आणि कनिका मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे. यापूर्वी तिने 'साथ निभाया साथिया', 'मन की आवाज प्रतिज्ञा 2', सावी की सवारी आणि नथ यांसारख्या टेलिव्हिजन शो आणि कलाकृतींच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता शुभीने आपल्या कारकिर्दीत आलेल्या आव्हानांबाबत भाष्य केले आहे. सोबतच तिने बॉलिवूडचा (Bollywood) दिग्गज दिग्दर्शक करण जोहरकडे (Karan Johar) एक मागणी केली आहे.
'समाजाकडून स्वीकारले जात नाही'
शुभी शर्मा म्हणाली, "मला शालेय जीवनात त्रास दिला जात होता. जेव्हा आम्हाला आमच्या आयुष्याबाबत समजण्यास सुरुवात होते. शिवाय इतर लोकांना आमच्याबाबत समजते तेव्हा नकारात्मक गोष्टी बोलल्या जातात. कोणीही आमचा गांभीर्याने विचार करत नाही. समाज आमच्याकडे मनोरंजक पद्धतीने पाहात असतो. ते आमच्या कुटुंबाबतही वाईट पद्धतीने भाष्य करतात. हे सर्व आम्हाला नैराश्यात नेणारे आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी प्रेमाच्या आणि सन्मानाच्या शोधात तृतीयपंथीयांच्या समुदायात दाखल झाले. तिथे माझे चांगल्या पद्धतीने स्वागत करण्यात आले."
बॉलिवूडमध्ये सन्मान मिळावा; शुभी शर्मा काय म्हणाली?
पुढे बोलताना शुभी शर्मा म्हणाली, "तृतीथपंथीयांना बॉलिवूडमध्ये फार कमी प्रमाणात संधी मिळतात. निर्माते त्यांना संधी देत नाहीत. नवाजुद्दीन सिद्धकीने 'हड्डी' या सिनेमात तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. अशा भूमिका तरी आम्हाला मिळायला पाहिजे होत्या. निर्मात्यांना आमच्यामधूनही कोणीतरी भेटू शकते. आम्ही प्रतिभावान आणि सुंदर आहोत."
आम्हीही चांगल्या भूमिका करु शकतो. मात्र, आम्हाला केवळ प्रमोशनच्या रांगेत उभे केले जाते. यापूर्वी बिग बॉसने आमच्यासाठी दरवाजे खुले केले होते. मात्र, आता तेथूनही बोलावले जात नाही. त्यामुळे आम्हाला बॉलिवूडमध्ये जास्तीत जास्त संधी मिळाव्यात, अशी मागणी शुभी शर्मा हिने केली आहे.
घरातून पळून येत मुंबईत झाली दाखल
शुभी शर्माने जेव्हा आई-वडिलांना मुंबईत जाऊन अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा सांगितली तेव्हा आम्हाला त्यांनी साथ दिली नाही. त्यामुळे ती घरातून पळून मुंबईत दाखल झाली होती. शुभी याबाबत बोलताना म्हणाली, "मुंबईत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. मला एका मुलाच्या रुममध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहता आले. मात्र, तिथेही बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. मला कोणीही जागा देण्यासाठी तयार नव्हते."
इतर महत्वाच्या बातम्या