Lock Upp : अंकिता लोखंडे प्रेग्नंट? कंगनाच्या लॉकअप शोमध्ये केला गौप्यस्फोट
Lock Upp : नुकतीच 'लॉकअप' (Lock Upp) या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) नं हजेरी लावली.
Lock Upp : अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'लॉकअप' (Lock Upp) हा शो सध्या चर्चेत आहे. नुकतीच या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) नं हजेरी लावली. अंकिता पवित्र रिश्ता 2 (Pavitra Rishta 2) या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये उपस्थित होती. शोमध्ये आल्यानंतर कंगनानं अंकिताला तिचं एक सिक्रेट सांगायला लावले. त्यावेळी अंकितानं एक गोष्ट तेथील उपस्थित लोकांसोबत शेअर केली. ही गोष्ट ऐकून कंगना आणि शोमधील स्पर्धक शॉक झाले.
अंकिताला जेव्हा कंगनानं सिक्रेट सांगायला लावले तेव्हा अंकिता म्हणाली, 'मी प्रेग्नंट आहे आणि ही गोष्ट विकीला पण माहित नाही.' हे ऐकताच कंगना आनंदी झाली. पण नंतर अंकितानं पुढे सांगितलं की, तिनं शोमधील स्पर्धकांना आणि कंगनाला एप्रिल फूल केलं. त्यावर कंगना म्हणाली, पण आज एक एप्रिल पण नाहिये. पण ही खोटी गोष्ट लवकरच खरी व्हावी, अशी मी आशा करते.
View this post on Instagram
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न सोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या स्मार्ट जोडी या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. रिपोर्टनुसार या कार्यक्रमाच्या एका एपिसोडचे विकी आणि अंकिता 7 लाख रूपये मानधन घेतात.
हेही वाचा :
- The Kashmir Files : द कश्मीर फाइल्स मधील 'हा' सिन शूट करताना अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि दर्शनला अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ
- Beast Trailer Release : विजय थलापतीच्या 'बीस्ट'चा ट्रेलर रिलीज, सिनेमात अॅक्शनचा तडका
- Kiran Gaikwad : देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडची पोस्ट चर्चेत; म्हणाला, 'आता पुढचा प्रवास हिच्यासोबत'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha