Emergency चित्रपटातील अनुपम खेर यांचा लूक रिलीज; साकारणार 'ही' भूमिका
अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) बहुचर्चित इमर्जन्सी (Emergency) या चित्रपटामध्ये अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे जयप्रकाश नारायण (JP) यांची भूमिका साकारणार आहेत.
![Emergency चित्रपटातील अनुपम खेर यांचा लूक रिलीज; साकारणार 'ही' भूमिका kangana ranaut movie emergency anupam kher first look release as jayaprakash narayan Emergency चित्रपटातील अनुपम खेर यांचा लूक रिलीज; साकारणार 'ही' भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/22/58d175ad1964813a35830bd9c2aeafb71658466979_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Emergency : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. कंगनाच्या चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहतात. लवकरच कंगनाचा इमर्जन्सी (Emergency) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. आता अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा या चित्रपटामधील लूक रिव्हिल करण्यात आला आहे.
अभिनेते अनुपम खेर इमर्जन्सी चित्रपटातील त्यांच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये ते जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. अनुपम खेर यांचा हा लूक पाहिल्यानंतर आता चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. इमर्जन्सी चित्रपटातील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कंगनानं दिग्दर्शित केलेल्या इमर्जेन्सी या चित्रपटामध्ये जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारताना अभिनमान आणि आनंद वाटत आहे. जय हो!'
पाहा पोस्ट:
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी कंगनानं Emergency चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया अकाऊंवर शेअर केला होता. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले. हा टीझर शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Presenting ‘Her’who was called ‘Sir’ इमर्जन्सीच्या शूटिंगला सुरुवात' टीझरच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डी. सी 1971 असं लिहिलेलं दिसत आहे. इमर्जन्सी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केलं आहे. कंगनाच्या चाहत्यांनी या टीझरला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा:
Emergency Teaser : 'Emergency'चा टीझर रिलीज; कंगना रनौतनं साकारली इंदिरा गांधींची भूमिका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)