RRR : 'हा चित्रपट मास्टरपीस आहे'; हॉलिवूड स्टार जोसेफ मॉर्गनकडून आरआरआरचं कौतुक
'द वॅम्पायर डायरीज' मधील अभिनेता जोसेफ मॉर्गन (Joseph Morgan) आणि त्याची पत्नी पर्सिया व्हाइट यांनी आरआरआर या चित्रपटाचे कौतुक केलं आहे.
RRR : दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर हा चित्रफट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामध्ये राम चरण (Ram Charan), जूनियर एनटीआर (Jr. NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगन (Ajay Devgn) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमधील कलाकारांची देखील मनं या चित्रपटानं जिंकली. 'द वॅम्पायर डायरीज' मधील अभिनेता जोसेफ मॉर्गन (Joseph Morgan) आणि त्याची पत्नी पर्सिया व्हाइट यांनी आरआरआर या चित्रपटाचे कौतुक केलं आहे.
जोसेफ मॉर्गननं ट्वीट शेअर करुन आरआरआर या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. ट्वीटमध्ये जोसेफनं लिहिलं, 'शूटिंगमधून थोडा वेळ मिळाला म्हणून मी माझ्या पत्नीसोबत म्हणजेच पर्सिया व्हाइटसोबत मी दोन जबरदस्त चित्रपट पाहिले. मी आरआरआर आणि एव्रीथिंग एव्रीवेयर ऑल एट वन्स हे दोन चित्रपट पाहिले. दोन्ही चित्रपट खूप छान आहेत. आम्ही हसलो, रडलो आम्हाला हे चित्रपट खूप आवडले.' जोसेफ मॉर्गनच्या ट्वीटला एका चाहत्यानं रिप्लाय दिला, 'आरआरआर पाहिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. ' या चाहत्याला जोसेफनं रिप्लाय दिला, 'सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट एक मास्टरपीस आहे. मी या चित्रपटाबद्दल अजूनही विचार करत आहे.'
It was an absolute masterpiece, from start to finish. I’ve been thinking about it ever since. https://t.co/1WfBAlJuuF
— Joseph Morgan (@JosephMorgan) June 28, 2022
आरआरआर मूव्हिजच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ट्वीट शेअर करुन चित्रपटाच्या टीमनं जोसेफचे आभार मानले. याआधी कॉमिक बुक रायटर जॅक्सननं देखील आरआरआर चित्रपटाचं कौतुक केलं होतं. RRR ला हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनने मिडसीझन अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीमध्ये नामांकन देण्यात आलं आहे.
हेही वाचा: