Jolly LLB 3 OTT Release:‘जॉली एलएलबी 3’ ओटीटीवर धडकणार! 100 कोटींचा टप्पा ओलांडला, आता अक्षय-अरशदची कोर्टातील जबरदस्त वादावादी घरबसल्या पाहता येणार
Jolly LLB 3: भारतात या चित्रपटाने तब्बल ₹115.85 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. सिनेमामध्ये अक्षय कुमार, अरशद वारसी, सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव आणि गजराज राव यांच्या भूमिका आहेत.

Jolly LLB 3 OTT Release : अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांचा धमाल कोर्टरूम ड्रामा ‘जॉली एलएलबी 3’ (Jolly LLB 3) आता लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. सिनेमागृहात हा चित्रपट पाहण्याचं जर राहून गेलं असेल, तर आता घरबसल्या आरामात हा सुपरहिट सिनेमा पाहण्याची संधी मिळणार आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. भारतात या चित्रपटाने तब्बल ₹115.85 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. कोर्टरूम ड्रामा, संवादफेक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाला विशेष दाद मिळाली. (OTT Release)
Jolly LLB 3: ओटीटीवर कधी रिलीज होणार?
ओटीटी प्लेच्या अहवालानुसार, ‘जॉली एलएलबी 3’चा प्रीमियर नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टार या दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकत्र होण्याची शक्यता आहे. अंदाजे 14 नोव्हेंबर 2025 रोजी हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होईल. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. साधारणपणे थिएटर आणि डिजिटल रिलीजच्या दरम्यान सहा ते आठ आठवड्यांचा फरक असतो, त्यामुळे ही तारीख योग्य मानली जात आहे.
जॉली LLB चित्रपटाचा तिसरा भाग
सुभाष कपूर दिग्दर्शित हा सिनेमा ‘जॉली एलएलबी’ मालिकेचा तिसरा भाग आहे. या वेळीही कोर्टातली शाब्दिक चकमक आणि न्यायव्यवस्थेवरचा हलकाफुलका विनोदी कटाक्ष याचं आकर्षण आहे. सिनेमा मध्ये अक्षय कुमार, अरशद वारसी, सौरभ शुक्ला, हुमा कुरेशी, अमृता राव आणि गजराज राव यांच्या भूमिका आहेत.
या भागात दोन्ही प्रसिद्ध ‘जॉली’ वकील आमनेसामने येतात. अक्षय कुमार ‘जॉली मिश्रा’ तर अरशद वारसी ‘जॉली त्यागी’च्या भूमिकेत आहेत. यापूर्वी पिंकविलाशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला होता की, “मी आणि अरशद वारसी पुन्हा एकत्र आलो आहोत, म्हणजेच जॉली 1 आणि जॉली 2 आमनेसामने आहेत. आणि त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता, तो खूपच मजेशीर माणूस आहे.”
किती कोटी कमावले?
सॅकनिल्कच्या एका अहवालानुसार, चित्रपटाने 51 व्या दिवशी फक्त ₹0.03 कोटी कमावले, ज्यामुळे त्याची एकूण कमाई ₹117.36 कोटी झाली. निर्मात्यांनी अद्याप हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे उघड केलेले नाही. तथापि, सोशल मीडियावर ' जॉली एलएलबी 3' 14 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. सध्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.





















