Jaya Bachchan Angry on Media: 'मी बहिरी नाहीये...', संतापलेल्या जया बच्चन यांनी पुन्हा एकदा पॅपाराझींना झापलं; लोक म्हणाले, 'अमिताभ बच्चन कसे झेलतात काय माहीत...'
Jaya Bachchan Angry on Media: व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांनी जे काही केलंय, त्यामुळे अनेकांना कमेंट करण्यास भाग पाडलं आहे. पुन्हा एकदा जया बच्चन मीडियावर संतापताना दिसल्या.

Jaya Bachchan Angry on Media: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन (Jaya Bacchan) यांचं आणि पॅपाराझींचं काय नातं आहे? देवास ठाऊक... जया बच्चन अनेकदा पॅपाराझींवर संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. पॅपाराझींवर चिडलेल्या जया बच्चन रागानं लालबुंद होतात आणि त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतात. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये 'अँग्री यंग मॅन' म्हणून ओळखलं जातं. अशातच, जया बच्चन यांना 'अँग्री वुमन'चा टॅग नेटकऱ्यांनी दिला आहे. नेहमीच कुणा ना कुणावर रागावणाऱ्या जया बच्चन यांचा आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांनी जे काही केलंय, त्यामुळे अनेकांना कमेंट करण्यास भाग पाडलं आहे. पुन्हा एकदा जया बच्चन मीडियावर संतापताना दिसल्या. जया बच्चन एका कार्यक्रमात पोहोचल्याचा हा व्हिडीओ कोइमोईनं शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलंय?
जया बच्चन आणि कुटुंबीय एका फिल्मच्या स्क्रिनिंगसाठी आल्या होत्या. त्या गाडीतून उतरुन पुढे आल्या आणि मुलगी श्वेता आणि मुलगा अभिषेक मागून येत होते. त्यामुळे त्यांची वाट पाहत त्या थांबल्या. त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पॅपाराझींनी त्यांना सतत मोठमोठ्यानं हाका मारायला सुरुवात केली. काही काळानंतर जया बच्चन चिडल्या. त्या म्हणाल्या, 'मी बहिरी नाहीये... आरामात बोला...'. त्यानंतर पॅपाराझी हसले. तेवढ्यात मागून श्वेता आणि अभिषेक येतात आणि जया बच्चन त्यांच्यासोबत तिथून निघून जातात. पण, जाताना मात्र चिडलेल्या जया बच्चन सर्वांना स्मितहास्य देत तिथून जातात. त्यांच्या मागे अभिषेक बच्चन जातो, पण कुणीच फोटोसाठी थांबत नाही. हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकजण जया बच्चन यांच्यावर टीका करत आहेत.
View this post on Instagram
चिडल्यामुळे जया बच्चन पुन्हा ट्रोल
लोक जया बच्चन यांच्या वागण्याबद्दल त्यांना ट्रोल करत आहेत आणि त्यांना प्रचंड राग येतो. एकानं लिहिलंय की, "ही स्वतःबद्दल काय विचार करते?" दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "बच्चन साहेबांनी या महिलेला 50 वर्ष कसं सहन केलं?" दुसऱ्यानं लिहिलंय की, "ही कुठची महाराणी आहे..." आणखी एकानं लिहिलंय की, "अमिताभ बच्चन यांनी काय विचार करुन हिच्याशी लग्न केलं..?"
एक युजर लिहितो की, "तुम्हाला का वाटंत की, तिनं तुम्हा सर्वांसाठी पोज द्यावी? आम्हाला तिचा उदास चेहरा पाहण्यात अजिबात रस नाही." एकानं लिहिलंय की, "ती आता नरकात जाण्याइतकी वयस्कर आहे..." दुसऱ्यानं लिहिलंय की, "ती नेहमीच चिडचिड करत असते..." लोक सातत्यानं कमेंट करत आहेत. दरम्यान, याबाबत जया बच्चन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
जया बच्चन यांचा लूक
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जया बच्चन खूपच सुंदर दिसत आहेत. त्या फार कमी अशाप्रकारच्या अंदाजात दिसून येतात. जया बच्चन अलीकडेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आल्या होत्या. यापूर्वी, लोकांनी कौटुंबिक कलहासाठी जया बच्चन यांना जबाबदार धरलं होतं. पण, सत्य काय आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























