Javed Akhtar : 'मी हिजाबचं समर्थन करत नाही पण...'; जावेद अख्तरांचं ट्वीट चर्चेत
जावेद अख्तर (javed akhtar) यांनी नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे.
Hijab Controversy : कर्नाटकातील हिजाब (Hijab) प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. हिजाब प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी या प्रकरणाबद्दल त्यांची मतं मांडली. अनेक सेलिब्रिटींनी देखील या प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. नुकतच जेष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (javed akhtar) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
जावेद अख्तर यांचं ट्वीट
जावेद अख्तर यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'मी हिजाबचं किंवा बुरख्याचं समर्थन करत नाही. मी माझ्या मतांवर ठाम आहे. पण मुलींना घाबरवणाऱ्या गुंडांची मी निंदा करतो. हे लोक त्या मुलींना कारण नसताना घाबरवण्याचा आणि धमकी देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. यामध्ये त्यांना मर्दानगीची वाटते? मला या गोष्टीची दया येत आहे.'
I have never been in favour of Hijab or Burqa. I still stand by that but at the same time I have nothing but deep contempt for these mobs of hooligans who are trying to intimidate a small group of girls and that too unsuccessfully. Is this their idea of “MANLINESS” . What a pity
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) February 10, 2022
जावेद अख्तर यांच्यासोबत बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी देखील या प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर त्यांची मतं मांडली आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर, रिचा चड्ढा आणि अभिनेता कमल हासन यांनी देखील पोस्ट शेअर केल्या आहेत.
संबंधित बातम्या
Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
Kajal Aggarwal, Samantha : बॉडी शेमिंग करणाऱ्यांना काजलचं सडेतोड उत्तर; समंथा म्हणाली...
Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांची प्रकृती खालावली ; उपचार सुरू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha