Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांची प्रकृती खालावली ; उपचार सुरू
माया गोविंद (Maya Govind) यांची प्रकृती खालावली आहे.
Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद (Maya Govind) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी 350 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमधील गाणी त्यांनी लिहिली आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांना दोनवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण सध्या त्यांच्यावर घरीच उपचार होत आहेत.
माया गोविंद यांच्या मुलानं म्हणजेच अजय गोविंद यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, ब्रेन ब्लड क्लॉटिंगमुळे त्यांना मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात योग्य पद्धतीन उपचार होत नसल्यानं माया गोविंदा यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.
अजय गोविंद यांनी सांगितले की, '27 ते 31 डिसेंबर या दरम्यान माया गोविंद यांना आरोग्य निधी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांना यूरीन इंफेक्शन आणि काही अन्य समस्या जाणवत होत्या. पण नंतर जेव्हा पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा 20 जानेवारी रोजी त्यांना पुन्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान लक्षात आलं की त्यांना ब्रेन ब्लड क्लॉटिंग झालं आहे. पण आरोग्य निधी रूग्णालयामध्ये उपचार योग्य पद्धतीने होत नसल्यानं 26 जानेवारी रोजी त्यांना घरी आणण्यात आलं. गेले दोन ते तीन दिवस आई बेशुद्ध आहे.'
आरोप, जलते बदन, सावन को आने दो, बेकाबू, दमन, टक्कर, पायल की झंकार, बाल ब्रह्मचारी, आर या पार, गर्व, लाल बादशाह, बांवरी हमेशा, चाहत, ईमानदार, तोहफा मोहब्बत का, अनमोल, याराना, दलाल, गज गामिनी, गंगा की कसम, हम तुम्हारे है सनम यांसारख्या 350 पेक्षा जास्त हिट चित्रपटांमधील गाणी माया यांनी लिहिली आहेत.
संबंधित बातम्या
Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
Kajal Aggarwal, Samantha : बॉडी शेमिंग करणाऱ्यांना काजलचं सडेतोड उत्तर; समंथा म्हणाली...
Pawankhind : 'हर हर महादेव'; 'पावनखिंड' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha