एक्स्प्लोर

बॉयफ्रेंड 'शिखू'ला सोबत घेऊन जान्हवी कपूर देवदर्शनाला, ब्युटी गर्लच्या जांभळ्या रंगातील ट्रॅडिशनल लूकची सगळीकडे चर्चा!

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया गेल्या बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत, असं बोललं जातं. त्यानंतर आता देवदर्शनासाठी ते दोघेही एकत्र दिसले आहेत.

Janhvi Kapoor : बॉलिवुड जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलंय. विशेष म्हणजे ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना जान्हवी तिच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, या बाबत  अपडेट्स देत असते. दरम्यान, जान्हवी कपूर थेट आंध्र प्रदेशमदील तिरुपती मंदिरात देवदर्शनला पोहोचली आहे. देवदर्शनाला जातानाचे तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. विशेष म्हणजे या देवदर्शनाला जाताना जान्हवीसोबत तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियादेखील होता. 

जान्हवी कपूर देवदर्शनाला पोहोचली थेट आंध्र प्रदेशमध्ये

जान्हवी कपूर तिच्या कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत आंध्र प्रदेशमध्ये भगवान व्यंकटेशाच्या दर्शनाला गेली होती. मंदिरात जाताना तिने जांभळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. दोघेही यावेळी खूप गोड दिसत होते. देवदर्शनादरम्यानचे त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. जान्हवी कपूरने जांभळ्या रंगाची साडी तसेच जांभळ्या रंगााच ब्लाऊज परिधान केला आहे. याच पकड्यांतील काही फोटो जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट केले आहेत. तर दुसरीकडे शिखर पहाडिया हा दक्षिण भारतीय लोकांप्रमाणे पांढऱ्या रंगाचे धोतर आणि वर गमछा परिधान करून देवदर्शनाला पोहोचला होता. या दोघांना पाहण्यासाठी मंदिर परिसरात लोकांनी चांगलीच गर्दी केली होती. 

जान्हवी करतेय शिखर पहाडियाला डेट 

गेल्या बऱ्याच दिवसांपासून जान्हवी आणि शिखर पहाडिया एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं. हे दोघे अनेकवेळा एकत्र दिसलेले आहेत. विशेष म्हणजे जान्वही कपूरनेदेखील या नात्याचा अप्रत्यक्षरित्या अनेकवेळा उल्लेख केलेला आहे. लहानपणापासून हे दोघे एकमेकांना ओळखत असून ते जिवापाड प्रेम करतात असे बोलले जाते. 

View this post on Instagram
 
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

2025 सालाच्या शेवटी होऊ शकते लग्न 

जान्हवी कपूरने याआधी 'शिखर' या नावाचे पेंडेंट परिधान केले होते. त्याचे फोटोदेखील चांगलेच व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे शिखर पहाडिया हा फक्त जान्हवीच नव्हे तर जान्हवीच्या कुटुंबीयांनादेखील आवडतो. मिळालेल्या माहितीनुसार 2025 सालाच्या शेवटपर्यंत शिखर आणि जान्हवी एकमेकांशी लग्न करू शकतात. या लग्नसोहळ्याची मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जान्हवी कपूर शिखरला प्रेमाने शिखू असं म्हणते तर शिखरदेखील जान्हवीला प्रेमाने लाडो असं संबोधतो.    

View this post on Instagram
 
A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

दरम्यान, जान्हवी कपूरचा येत्या 25 जुलै रोजी परम सुंदरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. चित्रपटात त्याचे नाव परम आहे तर जान्हवीचे नाव सुंदरी असे आहे. 

हेही वाचा :

दुबईत जन्म, मुंबईत शिकली, कोरिओग्राफर धनश्री वर्माकडे अफाट संपत्ती; युझवेंद्रची बायको किती कोटींची मालकीण? 

धनश्री वर्मासोबत घटस्फोटाच्या चर्चेनंतर चहलची सूचक पोस्ट, चक्क हात जोडून मन मोकळं केलं; नेमकं काय म्हणाला? 

हसले, खेळले आनंदाने सोबत राहिले, मग 4 वर्षांनी युझवेंद्र-धनश्रीच्या नात्यात मिठाचा खडा कुठे पडला? घटस्फोटाच्या चर्चेला उधाण!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget