दुबईत जन्म, मुंबईत शिकली, कोरिओग्राफर धनश्री वर्माकडे अफाट संपत्ती; युझवेंद्रची बायको किती कोटींची मालकीण?
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे. असे असतानाच धनश्री वर्माची संपत्ती किती आहे, असे विचारले जाते
मुंबई : क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. दोघांनीही नुकतेच एकमेकांना इन्स्टाग्रावर अनफॉलो केले आहे. विशेष म्हणजे धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून चहल हे नाव हटवले आहे. त्यामुळेच हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार का असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान, हे दोघेही विभक्त होण्याच्या वावड्या उठलेल्या असताना आता धनश्री वर्माची संपत्ती नेमकी किती आहे? हे जाणून घेऊ या...
धनश्री वर्मा कोरिओग्राफर आणि डेन्टिस्ट
धनश्री वर्मा ही अवघ्या 28 वर्षांची आहे. तिचा जन्म 27 सप्टेंबर 1996 रोजी दुबईत झाला होता. धनश्री वर्माला सगळीकडे युझवेंद्र चहलची बायको म्हणून ओळखले जाते. मात्र फक्त चहलची बायको म्हणून तिची ओळख नाही. तर ती स्वत: एक कोरिओग्राफर आहे. तिचे स्वत:चे एक यूट्यूब चॅनेल आहे. यूट्यूबवर तिचे लाखो सबस्क्रायबर आहेत. विशेष म्हणजे ती एक डेन्टिस्ट आहे. दंतवैद्यकशास्त्राची पदवी तिने मुंबईतील डी वाय पाटील महाविद्यालयातून मिळवलेली आहे. डेन्टिस्ट झाल्यानंतर 2014 साली तिने डान्सलाच तिचे करिअर बनवले. ती यूट्यूबवर डान्सचे व्हिडीओ अपलोड करते.
View this post on Instagram
धनश्री वर्माची संपत्ती किती?
धनश्री वर्माची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती करते. याच जाहिराती करण्याचे ती कोट्यवधी रुपये घेते. विशेष म्हणजे ती लवकरच एका दाक्षिणात्त्य चित्रपटात झळकणार आहे. दुसरीकडे युझवेंद्र चहलची संपत्ती 45 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. आयपीएल 2025 साठी युझवेंद्र चहलसाठी 18 कोटी रुपयांची बोली लागलेली आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्या, आलिशान घर आहे. तोदेखील वेगवेगळ्या ब्रँड्सच्या जाहिराती करतो.
हेही वाचा :