धनश्री वर्मासोबत घटस्फोटाच्या चर्चेनंतर चहलची सूचक पोस्ट, चक्क हात जोडून मन मोकळं केलं; नेमकं काय म्हणाला?
Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce : क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांनी एकमेकांचे फोटो डिलिट केले आहेत. त्यांनी एकमेकांना अनफॉलोदेखील केलंय.
मुंबई : भारताचा स्टार क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी तसेच कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce) यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. नुकतेच त्यांनी इन्स्टाग्राम खात्यावर एकमेकांना अनफॉलो केलं असून एकमेकांचे फोटो असलेल्या सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत. युझवेंद्र आणि धनश्री यांच्या या कृतीमुळे लवकरच दोघेही अधिकृतपणे विभक्त होतात की काय? असे विचारले जात आहे. त्यांच्या घटस्फोटाची चर्चा चालू असतानाच आता युझवेंद्र चहलने एक सूचक पोस्ट केली आहे. चहलच्या पोस्टचे अनेक अर्थ काढले जात आहेत..
चहल आणि धनश्री यांच्यात नेमकं काय घडलं?
गेल्या काही महिन्यांपासून धनश्री आणि युजवेंद्र यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. तसा दावा केला जातोय. त्यांच्या गटस्फोटाच्या वावड्या गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या आहेत. असे असताना आता दोघांनीही त्यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. इन्स्टाग्राम खात्यावर दोघांचेही लाखोंनी चाहते आहेत. त्यांच्या एका पोस्टवर हजारो प्रतिक्रिया असतात. असे असतानाच त्यांनी एकमेकांना अनफॉलो करून दोघांच्याही इन्स्टाग्राम खात्यावरून एकमेकांचे फोटो, व्हिडीओज डिलिट केले आहेत.
View this post on Instagram
एकमेकांचे फोटो केले डिलिट
विशेष म्हणजे सेलिब्रिटींमध्ये हे अगदी चर्मिंग कपल म्हणून ओळखले जाते. दोघेही कुठे फिरायला गेले की त्यांचे फोटो अपलोड करायचे. धनश्री वर्मा कोरिओग्राफर असल्यामुळे जहल आणि धनश्री एकमेकांसोबत डान्स करतानाचेही व्हिडीओ अपलोड करायचे. मात्र आता हे सर्व फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून गायब झाले आहेत. त्यामुळेच हे दोघेही विभक्त होणार का? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत.
चहलने नेमकी काय पोस्ट केली?
या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा चालू असतानाच चहलने इन्स्टाग्राम खात्यावर एक स्टोरी ठेवली आहे. या स्टोरीमध्ये चार ते पाच ओळी इंग्रजी भाषेत लिहून त्याने शेवटी हात जोडले आहेत. चहलच्या या स्टोरीचेही वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. "घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे व्यक्तीचे चारित्र्य प्रकाशझोतात येत असते. प्रत्येकाला आपापला प्रवास माहिती असतो. प्रत्येकालाच आपापल्या वेदाना माहिती असतात. यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय-काय केलंय हे प्रत्येकालाच माहिती असते. आपल्या आई-वडिलांना भूषणावह वाटावं यासाठी प्रत्येकानेच कष्ट करून घाम गाळलेला असतो," असं युझवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये म्हटलंय.
दरम्यान, युझवेंद्र चहलच्या या पोस्टनंतर त्याच्या धनश्रीसोबतच्या नात्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भविष्यात ते दोघेही विभक्त होणार का? असे विचारले जात आहे.
हेही वाचा :