VIDEO : ओठांवर लाली, डोळ्यांवर गॉगल; अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स
Jahnavi Kiran Killekar dance video : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Jahnavi Kiran Killekar dance video : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Kiran Killekar dance video) सध्या तिच्या धमाकेदार डान्समुळे चर्चेत आहे. गोविंदाच्या 'Tan Se Sarakta Jaye' या लोकप्रिय गाण्यावर तिने क्रांती माळेगावकरसोबत डान्स करत धमाल केली आहे. या दोघांचा डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर या व्हिडीओने चांगलाच धुमाकूळ घातलाय. (Jahnavi Kiran Killekar dance video)
क्रांती माळेगावकरने स्वतः हा डान्स व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. त्यानंतर अल्पावधीतच व्हिडीओला हजारो व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. नेटकऱ्यांनी जान्हवीच्या डान्स स्टाईलचं विशेष कौतुक केलं असून तिची ऊर्जा, हावभाव आणि गोविंदा स्टेप्सची अचूक नक्कल यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
जान्हवी किल्लेकर ही मराठी टेलिव्हिजनमधील एक उदयोन्मुख आणि टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक नाटकं, सीरियल्स आणि रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. तिच्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्यासाठीही ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असून ती तिचे डान्स व्हिडीओ आणि वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्टी शेअर करत असते. (Jahnavi Kiran Killekar dance video)
तिचा हा डान्स व्हिडीओ पाहता, ती गोविंदाच्या शैलीने भारलेली असून नव्या पिढीच्या कलाकारांमध्ये ती स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत असल्याचं दिसतं. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे आता चाहते मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. (Jahnavi Kiran Killekar dance video)
'बिग बॉस'मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून जान्हवी किल्लेकर आल्यानंतर तिची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. यापूर्वी तिने अनेक मराठी मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. जान्हवी ही छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मालिकांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी जान्हवी प्रसिद्ध आहे. (Jahnavi Kiran Killekar dance video)
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























