तिनं अख्ख्या बॉलिवुडवर राज्य केलं, पण असे पाच पिक्चर जे दीपिकाला भेटलेच नाही, इच्छा असूनही नशिबानं पाठ फिरवली!
दीपिका पादकोन ही बॉलिवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक आघाडीच्या चित्रपटांत काम केलेलं आहे. मात्र तिच्या हातातून काही चित्रपट निसटलेलेही आहेत.
मुंबई : बॉलिवुडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणचे (Deepika Padukone) भारत तसेच जगभरात लाखोंनी चाहते आहेत. तिने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केलेलं आहे. दीपिका नुकतेच आई झालेली आहे. दरम्यान, आई झाल्यानंतर दीपिका आता वेगवेगळ्या कार्यक्रमांत दिसत आहे. दरम्यान, दीपिकाने आतापर्यंत अनेक आघाडीच्या चित्रपटांत काम केलेलं असलं तरी तिच्या हातातून अनेक मोठे चित्रपट सुटलेले आहेत. या चित्रपटांत अभिनय करण्यासाठी दीपिकाला विचारणा करण्यात आली होती. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे ऐनवेळी दीपिकाच्या हातातून हे चित्रपट गेले होते. हे चित्रपट नेमके कोणते आहेत? हे जाणून घेऊ या..
दीपिका बॉलिवुडमधील एक आघाडीची अभिनेत्री असली तरी तिच्या हातून काही मोठे चित्रपट निसटलेले आहेत. हे चित्रपट कोणते होते? हे जाणून घेऊ या..
‘रॉकस्टार’ (2011)
इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या रॉकस्टार या सुपरहिट चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात दीपिका पादुकोणला काम करायचे होते. मात्र चित्रपटातील दिग्दर्शकाने नरगीस फाखरी या अभिनेत्रीची निवड केली.
‘जब तक है जान’ (2012)
जब तक है जान या चित्रपटात शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत होता. दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटासाठी कॅटरिना आणि दीपिका या दोघींना ऑफर देण्यात आली होती. मात्र डेट्स मॅच न झाल्याने दीपिका पादुकोणच्या हातातून हा चित्रपटही गेला होता. दीपिकाला यश चोप्रा यांच्या या चित्रपटात काम करायचे होते. पण ते शक्य झाले नाही.
‘प्रेम रतन धन पायो’ (2015)
प्रेम रतन धन पायो या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बड़जात्या यांनी केले होते. या चित्रपटात सलमान खान हे प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दीपिका पादुकोणला या चित्रपटासाठी निडलवं होतं. मात्र डेट्स न मिळाल्याने दीपिका पादुकोणच्या हातातून हा चित्रपटही निसटला होता.
‘सुल्तान’ (2016)
सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला सुल्तान हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सलमान खानसोबत अनुष्का शर्माला कास्ट करण्यात आलं होतं. या चित्रपटासाठीही दीपिका पादुकोणला विचारणा झालीह होती. मात्र दीपिकाच्या अगोदर अनुष्काने या चित्रपटासाठी होकार दिला होता, त्यामुळे दीपिकाच्या हातातून हा चित्रपट गेला होता.
‘गंगूबाई काठियावाड़ी’ (2022)
संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचीही दीपिका पादुकोणला ऑफर मिळाली होती. मात्र नंतर हा चित्रपट आलिया भट्टला देण्यात आला.
दरम्यान, दीपिकाचे या वर्षी ‘पठाण’ आणि ‘कल्कि 2898 एडी’ हे दोन मोठे चित्रपट आले. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. दीपिका एक हायपेड अभिनेत्री असून तिला चित्रपटात घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.
हेही वाचा :
गदर-3 चित्रपटात नाना पाटेकर झळकणार? थेट खलनायकाची भूमिका करणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय