'फायर है मै' म्हणणारा 'पुष्पा' हमसून हमसून रडला, नव्या आरोपांनंतर अल्लू अर्जुन भावूक, 'त्या' घटनेचा उल्लेख करताच कंठ दाटला!
पुष्पा-2 या चित्रपटानंतर संपूर्ण भारतभरात चर्चेचा विषय ठरलेला अल्लू अर्जुन हा अभिनेता भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
मुंबई : हैद्राबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमिअर शोवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुनवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. अल्लू अर्जुनमुळेच या महिलेचा मृत्यू झाला, असा दावा केला जातोय. तेलंगाणातील काँग्रेसचे नेते तथा मुख्यमंत्री रवेंथ रेड्डी यांनी अल्लू अर्जुनला नव्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. त्यानंतर अल्लू अर्जुनने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत अल्लू अर्जुन भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
तेलंगाणाच्या संसदेत अल्लू अर्जुनर गंभीर आरोप
अल्लु आर्जुनच्या चित्रपटाच्या प्रिमियर शोवेळी झालेली चेंगराचेंगरी आणि महिलेच्या मृत्यूचा मुद्दा तेलंगणाच्या विधानसभेत उपस्थित करण्यात आला. यावेळी एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी अल्लू अर्जुनवर त्याचे नाव न घेता गंभीर स्वरुपाचे आरोप केले. चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे अल्लू अर्जुनला सांगण्यात आले होते. त्यानंतरही तो चित्रपट पाहात बसला. तसेच आता चित्रपट चांगलाच हिट होणार, असंही अल्लू अर्जुन म्हणाला असा दावा, अकबरुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेत केला.
पत्रकार परिषद घेऊन अल्लू अर्जुनने सर्व आरोप फेटाळले
ओवैसी यांच्या या दाव्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या हैदराबादमधील जुबली हिल्स येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने रेवंथ रेड्डी तसेच अकबरुद्दीन ओवैसी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले. चित्रपटाच्या प्रिमियरवेळी झालेली घटना हा दुर्दैवी अपघात होता. यात माझा काहीही दोष नाही. चित्रपटगृहाला मी मंदीर समजतो. चित्रपटगृहाच्या परिसरात अशी घटना झाल्यामुळे मला दु:ख झालेले आहे, असे अल्लू अर्जुन म्हणाला.
अल्लू अर्जुन झाला भावुक
तसेच, माझ्यावर अपमानजनक आरोप करण्यात आले आहेत. सोबतच असे आरोप करून माझे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. लोक मला गेल्या 20 वर्षांपासून ओळखतात. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर चित्रपट हिट होईल, असे मी कसे म्हणू शकतो. मी सध्या कामालाही जाऊ शकत नाहीये, असं अल्लू अर्जुनने यावेळी सांगितलं. हे सर्वकाही कथन करत असताना अल्लू अर्जुनला भावना अनावर झाल्या. त्याचा कंठ दाटला होता.
Allu Arjun Video :
VIDEO | Actor Allu Arjun (@alluarjun) got emotional as he addressed a press conference in Hyderabad over 'Pushpa-2' stampede incident, earlier today.
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2024
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/ipg1HGiVdd
दरम्यान, तेलंगाणाच्या विधानसभेत करण्यात आलेले सर्व आरोप अल्लू अर्जुनने फेटाळल्यानंतर आता पुढे काय होणार? तेलंगाणाचे सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : अल्लू अर्जुनला अटक, हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई