Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
Varun Dhawan : संपूर्ण देश टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. त्याचवेळी वरुण धवनने टीम इंडियाच्या विजयावर एक पोस्ट टाकत ऑस्ट्रेलियाला मीठ चोळलं आहे.
Varun Dhawan on Rohit Sharma : T20 विश्वचषक 2024 मध्ये भारताने सुपर 8 सामन्यात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत भारताचा सामना T20 चॅम्पियन 2022 इंग्लंडशी होणार आहे. रोहित शर्माची 41 चेंडूत 92 धावांची धमाकेदार खेळी आणि अर्शदीप सिंगच्या 3 विकेट्समुळे टीम इंडियाला उपांत्य फेरीत नेण्यात यश आले. संपूर्ण देश टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. त्याचवेळी वरुण धवनने टीम इंडियाच्या विजयावर एक पोस्ट टाकत ऑस्ट्रेलियाला मीठ चोळलं आहे.
बदला टीम इंडियाने घेतला
वरुण धवनने त्याच्या बदलापूर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये वरुणच्या जागी रोहित शर्माचा चेहरा दिसत असून चित्रपटाचे नाव बदलापूरवरून बदलापुरा करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने वनडे विश्वचषक 2023 फायनलमधील पराभवाचा बदला घेतल्याचा वरुणला आनंद आहे.
Instagram story of Varun Dhawan for Captain Rohit Sharma 🇮🇳 pic.twitter.com/8zLxiZCIGL
— Johns. (@CricCrazyJohns) June 25, 2024
भारताने शानदार खेळी केली
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 205 धावा दिल्या होत्या आणि प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 विकेट गमावून केवळ 181 धावा करता आल्या. भारताच्या विजयात प्रत्येक खेळाडूचे मोठे योगदान नव्हते, पण सर्वच खेळाडूंनी मेहनत घेतली. येथे या विजयाचे सर्वात मोठे हिरो म्हणून अर्शदीप सिंग आणि रोहित शर्मा समोर आले आहेत.
Instagram story by Arshdeep Singh for Captain Rohit Sharma 🇮🇳 pic.twitter.com/IHuLh7cmwm
— Johns. (@CricCrazyJohns) June 25, 2024
वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा बावल या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी बनवला होता, जो रणबीर कपूरसोबत रामायण बनवत होता. आता वरुण धवन दक्षिणेतील दिग्दर्शक ॲटलीच्या 'बेबी जॉन' या चित्रपटात दिसणार आहे, जो ॲटलीच्या 'थेरी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. याशिवाय वरुण प्राइम व्हिडिओच्या सिटाडेल या मालिकेत साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे.
Never seen any Player hammered 4 sixes vs Mitchell Starc in ICC Tournaments, But Rohit ...
— Richard Kettleborough (@RichKettle07) June 24, 2024
Rohit Sharma got into Vintage Mode, that set the tone for Team India 🇮🇳
29 Runs against Mitchell Starc is not everyone's cup of tea ☕ #INDvsAUS #RohitSharma pic.twitter.com/P8iCKV4qym
इतर महत्वाच्या बातम्या