Ileana D'cruz : एकटीच लेकराला कसं सांभाळतीस? बाळाचा बाप कुठाय?? इलियाना डिक्रुझनं एकाच फोटोत बत्ती गुल केली!
Ileana D'cruz : इलियाना डिक्रूझने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांशी खास संवाद साधला. चाहत्यांनी अभिनेत्रीला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले.
Ileana D'cruz : इलियाना डिक्रूझ ही एक प्रतिभावान बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी एका मुलाची आई झाली आहे. इलियाना डिक्रूजने यावर्षी ऑगस्टमध्ये तिच्या गोंडस बाळाचा फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर सर्वजण अभिनेत्रीला तिच्या जोडीदाराबद्दल विचारत होते. आता इलियानाने चाहत्यांच्या या प्रश्नांची उत्तरेही दिली. इलियानाने ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेंड मायकलला (Michael Dolan) दीर्घकाळ डेट केले, त्यानंतर या वर्षी दोघांनी लग्न केले. एका चाहत्याने इलियानाला तिचा नवरा आणि बाळाच्या वडिलांबद्दल विचारले, ज्याला फोटोसह उत्तर देत बोलती बंद केली.
View this post on Instagram
बाळाची एकटी कशी काळजी घेते?
इलियाना डिक्रूझने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी खास संवाद साधला. चाहत्यांनी अभिनेत्रीला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. दरम्यान, एका चाहत्याने इलियानाला तिच्या जोडीदाराबद्दल प्रश्न विचारला. इलियानाला विचारण्यात आले की ती आपल्या बाळाची एकटी कशी काळजी घेते? या प्रश्नाचे उत्तर देताना इलियानाने पतीसोबतचा एक फोटो शेअर केला.
या फोटोमध्ये इलियाना आणि मायकल अँड्र्यू नीबोन एकमेकांच्या डोळ्यात हरवले आहेत. या फोटोसोबत इलियानाने लिहिले, 'मी सिंगल नाही...' या पोस्टद्वारे इलियानाने सांगितले आहे की ती अविवाहित नाही आणि पतीसोबत तिच्या बाळाची काळजी घेत आहे. यादरम्यान एका चाहत्याने असेही विचारले की, 'गरोदर असताना आई सोबत होती का?' यावर अभिनेत्रीने तिच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की आई तिच्यासोबत होती.
View this post on Instagram
इलियानाचे लग्न कधी झाले?
अभिनेत्री इलियाना डिक्रूजने 13 मे 2023 रोजी मायकल डोलनशी लग्न केले होते. तिच्या गरोदरपणाची बातमी ऐकल्यानंतर चार आठवड्यांच्या आत अभिनेत्रीने मायकलशी लग्न केले. ज्याचा तिने एका मुलाखतीत खुलासा केला. लग्नानंतर काही काळातच इलियानाने तिच्या पतीचा चेहरा जगाला दाखवला. अभिनेत्रीने तिच्या मुलाचे नाव कोआ फिनिक्स डोलन ठेवले आहे, ज्याचा पूर्ण चेहरा इलियानाने क्वचितच दाखवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या